Goa: पैकुळ सत्तरीत तातडीने पुल बांधावा; अन्यथा आंदोलन

वाळपईतील नागरिकांचा (Valpoi Citizens) सरकारला इशारा (Goa)
Citizens of Paikul, Melavali, Dhada Murmune during the march at Walpai - Goa.
Citizens of Paikul, Melavali, Dhada Murmune during the march at Walpai - Goa.Dainik Gomantak
Published on
Updated on

Valpoi: जुलै महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे पैकुळ गावला जोडणारा जुना पुल पुराच्या (Flood in July) प्रवाहात वाहून गेला होता (Bridge Collapsed). त्यामुळे पैकुळ व शेजारील गावचा (Paikul & nearby area) संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे. त्याचा परिणाम होऊन जलवाहीनी फुटल्यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहै. पुल कोसळुन 25 दिवस उलटले आहेत. त्यामुळे पैकुळच्या पुलाच्या (Paikul Bridge) बांधकामाची प्रक्रिया सरकारने जलदगतीने हाती घेतली पाहिजे. व पाणी पुरवठाही सुरळीत केला पाहिजे. नाहीतर येत्या पंधरा दिवसानंतर आम्ही वाळपई फोंडा मार्गावर गुळेली तिस्क येथे आंदोलन (Agitation at Valpoi - Ponda Road) करण्याचा खणखणीत इशारा मेळावली व वाड्यावरील लोकांनी सरकारला दिला आहे. (Goa)

Citizens of Paikul, Melavali, Dhada Murmune during the march at Walpai - Goa.
Murder Case: तरूणीच्या कुटुंबियांसह हळदोण्यात हजारो लोक रस्त्यावर

आज मंगळवारी मेळावली गावच्या धडा, पैकुळ, मुरमुणे, मैंगिणे वाड्यावरील नागरिकांनी वाळपई उपजिल्हाधिकारी व पाणी पुरवठा विभागावर मोर्चा नेऊन पंधरा दिवसांची वेळ सरकारला दिली आहे. नागरिक अजित देसाई म्हणाले पैकुळ गावातील पुल मोडल्याने जलवाहीनी देखील मोडलेली आहे. पैकुळ ते मेळावली, धडा, मुरमुणे भागात पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला असून पर्यायी टँक्करची व्यवस्था पुरणारी नाही. पैकुळ गावातून मार्गाने लोकांना ४५ मिनीटे चालत जावे लागते आहे. पर्यायी मार्ग चिखलमय व जंगली श्वापदांच्या भितीखालील आहे. मुरमुणे येथे पर्यायी म्हणून बंधारावर जलस्त्रोत विभागाने पुढाकार घेऊन फळ्या घातल्या आहेत. त्यावरून लोक जातात. पण पावसाळ्यात हे धोक्याचे आहे. पैकुळ गावात दररोज सुमारे दीडशे लीटर दुध मिळत होते. पण पुल मोडल्याने दुधाचा पुरवठा करणे शक्य होत नाही. प्रसंगी सरकारने पैकुळ ते अडवई अशी दुधासाठी वाहनाची व्यवस्था केली पाहिजे होती. ती केली नसल्याने दररोज उत्पादित होणारे दुध करायचे तरी काय? त्यामुळे लोकांनी गोवंश विकला आहे. सरकार सांगते आम्ही शेतकरी वर्गासोबत आहोत. पण साधी वाहनाची व्यवस्था केली जात नाही हे शेतकर्यांचे दुर्दैव म्हणावे लागेल. अन्य गोष्टींसाठी सरकार मोठा खर्च करीत असते. म्हणूनच पुलाच्या बांधकामाची प्रक्रिया सरकारने तत्काळ करावी असे निवेदन उपजिल्हाकारी यांना देण्यात आल्याचे देसाई म्हणाले.

Citizens of Paikul, Melavali, Dhada Murmune during the march at Walpai - Goa.
Goa Police: गृहरक्षक रवळू गांवस यांचा हणजुण पोलीसातर्फे जाहीर सत्कार

पर्यायी वाटेने जाण्यासाठी सकाळी ८ ते रात्री ८ एवढीच मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. रात्रीच्यावेळी कामावरून घरी परतत असलेल्या लोकांनी करायचे तरी काय हा प्रश्न आहे. म्हणूनच पंधरा दिवसात पाणी पुरवठा प्रश्न, पुलाचा प्रश्न मार्गी लावावा अशा मागणी लोकांनी केली आहे. लोकांनी पाणी पुरवठा विभागात धडक देऊन पाणी समस्येची कैफियत मांडली. तसेच उपजिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर व मामलेदार दशरथ गावस यांची भेट घेऊन समस्ये विषयी चर्चा केली. राजेश आजगावकर यांनी हा विषय सरकार दरबारी जिल्हाधिकारी पर्यंत पाठपुरावा केला जाणार असल्याचे सांगितले. यावेळी अजित देसाई, शंकर नाईक, पंच अर्जून मेळेकर आदी असंख्य नागरिकांची उपस्थिती होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com