Goa: चाटर्ड विमान सेवा सुरू करा

आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणांवरचे निर्बंध शिथील झाल्यावर चाटर्ड विमानांना केंद्र सरकार परवानगी देऊ शकते.
चाटर्ड विमान
चाटर्ड विमान Dainik Gomantak

पणजी: कोविड (Covid-19) नियमावलींचे पालन करून सरकारने चाटर्ड विमान (charter flights) सेवा सुरू करावी, अशी मागणी टूर ॲण्ड ट्रॅव्हल असोसिएशन ऑफ इंडिया (Tour and Travel Association of India) या पर्यटन (Torusim) व्यावसायिकांच्या संघटनेने काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांची भेट घेऊन केली.

मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या अख्यत्यारीतेत हा विषय येत असून ऑक्टोबरपासून आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणांवरचे निर्बंध शिथील झाल्यावर चाटर्ट विमानांना केंद्र सरकार परवानगी देऊ शकते, असे या संघटनेच्या शिष्टमंडळाकडे चर्चा करताना नमूद केले.

चाटर्ड विमान
Goa: आधी कोविड चाचणी केंद्रे सुरू करा आणि नंतर सीमा खुल्या करा

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले, की कोविड नियमावली लागू करून आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी गोव्याचे दरवाजे उघडण्याची सरकारची तयारी आहे. चाटर्ड विमानांना मात्र केंद्र सरकारची परवानगी लागेल. यापूर्वी तशी विनंती केद्रीय गृह मंत्रालय व केंद्रीय पर्यटन मंत्रालयाला केली होती आता पुन्हा नव्याने या मंत्रालयांना तशी विनंती करू. केंद्र सरकारच्या परवानगीविना चाटर्ड विमाने देशात येऊ शकत नाहीत. पर्यटन क्षेत्र सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे, त्यासाठी सर्व कोविड नियमावलींचा विचार सरकारने सुरू केला आहे.

चाटर्ड विमान
Goa: दुजाभाव न ठेवता राज्‍याचा विकास

ते म्हणाले, पुढील दोन महिने महत्त्वाचे आहेत. त्या काळात कोविड परिस्थितीवर सरकारची नजर असेल. पुढील निर्णय या काळात परिस्थितीवर अवलंबून आहेत. आता आम्हाला पर्यटन क्षेत्र सुरू करावेसे वाटते; मात्र कोविडची तिसरी लाट आली तर हा विचार बदलावा लागेल.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी 18 वर्षांवरील युवक-युवतींचे लसीकरण झाल्याने महाविद्यालये सुरू करण्याचा विचार करता येईल; मात्र शाळा, हायस्कूल आणि उच्च माध्यमिक विद्यालये सुरू करण्याचा विचार सरकारने केला नसल्याचे स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com