Goa Coldrif Cough Syrup Bans Dainik Gomantak
गोवा

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

Goa Coldrif Cough Syrup Bans: राज्यात कोल्ड्रिफ सिरपचा वापर आणि विक्री तात्काळ थांबविण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने (FDA) जारी केले आहेत.

Sameer Amunekar

पणजी : कफ सिरपमध्ये विषारी घटक मिसळल्यामुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानात बालकांच्या मृत्यूच्या दुर्दैवी घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर, गोवा अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) रविवारी नागरिकांसाठी तातडीची धोक्याची सूचना जारी केली. राज्यात कोल्ड्रिफ सिरपचा वापर आणि विक्री तात्काळ थांबविण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने (FDA) जारी केले आहेत.

एफडीएने दिलेल्या सूचनेनुसार, कोणाजवळ हे औषध उपलब्ध असल्यास त्यांनी ते off-dfda.goa@nic.in या ईमेलवर कळवावे किंवा जवळच्या औषध नियंत्रण अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. संबंधित बॅचच्या सर्व साठ्याची माहिती गोळा करण्याचे आणि त्याची विक्री रोखण्याचे निर्देश औषध विक्रेत्यांना देण्यात आले आहेत.

दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये या कोल्ड्रिफ सिरपच्या सेवनामुळे काही मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्या आहेत. त्या प्रकरणाची चौकशी करताना मध्य प्रदेश एफडीएने या सिरपचे नमुने तपासले असता त्यात डायईथीलीन ग्लायकॉल (Diethylene Glycol) या विषारी रसायनाचा अंश आढळला होता. हे रसायन मानवी शरीरासाठी अत्यंत हानिकारक असून, यामुळे मूत्रपिंड निकामी होणे, श्वसनास अडचण येणे आणि मृत्यूही होऊ शकतो.

या पार्श्वभूमीवर गोवा एफडीएने खबरदारीचा उपाय म्हणून तात्काळ कारवाई करत राज्यातील सर्व रुग्णालये, औषध दुकाने आणि घाऊक विक्रेत्यांना हे औषध विक्रीसाठी ठेवू नये, अशी स्पष्ट सूचना दिली आहे.

तसेच जनतेलाही आवाहन करण्यात आले आहे की, कोल्ड्रिफ सिरप किंवा त्याच नावाचे औषध आपल्या जवळ असल्यास त्वरित कळवावे आणि त्याचा वापर टाळावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik: 'पूजा नाईकच्या आरोपांना पुरावा मिळेना', DGP आलोक कुमार यांचा खुलासा; प्रकरणाचा तपास थंडावणार?

अग्रलेख: गोव्यात गुन्हा करा, 'बिनधास्त पसार' व्हा! सुरक्षा यंत्रणांना जाग येण्यापूर्वीच गुन्हेगार गायब

Goa Politics: 'शांत राहा! आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात', मनोज परब यांचा दावा, कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन; Watch Video

DLF Housing Project: 'दाबोळी टेकडीवरील एकाही झाडाला हात लावू नका', कोर्टाची 'डीएलएफ'ला ताकीद

Goa Politics: खरी कुजबुज; काँग्रेस 'झेडपी' निवडणुकीबाबत गंभीर आहे?

SCROLL FOR NEXT