Goa Politics: 'आप'च्या राजकारणाची स्क्रिप्ट उघड! "छुपे साटेलोटे नेत्यांच्या राजीनाम्याला कारणीभूत", काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आक्रमक

Goa Congress Amit Patkar: गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी 'आप'च्या अंतर्गत फुटीवरून केजरीवाल यांच्या 'फसव्या' राजकारणावर सडकून टीका केली
AAP Congress clash Goa
AAP Congress clash GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: आप'चे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोवा दौऱ्यावर असताना काँग्रेस आणि भाजपवर केलेल्या टीकेनंतर गोव्याचे राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळतेय. भाजपने केजरीवाल यांना 'ऑडी'वरून लक्ष्य केल्यानंतर, आता गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी 'आप'च्या अंतर्गत फुटीवरून केजरीवाल यांच्या 'फसव्या' राजकारणावर सडकून टीका केली आहे.

केजरीवाल गोव्यात असतानाच 'आप'च्या दोन प्रमुख नेत्यांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसने या घटनेचा फायदा घेत 'आप'ला घेरले. गोवा काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी ट्विट करत केजरीवाल यांच्यावर थेट निशाणा साधला.

पाटकर म्हणाले, "पॉल बी. लोबो जे एकेकाळी आपचा महत्त्वाचा आधारस्तंभ होते, त्यांचा आजचा राजीनामा तर गोव्यात वाजणारी ही धोक्याची घंटा आहे. अरविंद केजरीवाल, तुम्ही राज्यात उपस्थित असतानाच जेव्हा तुमचेच महत्त्वाचे शिलेदार पक्ष सोडतात, तेव्हा तो तुमच्या फसव्या राजकारणावरचा निकाल असतो."

AAP Congress clash Goa
Goa Politics: खरी कुजबुज; तरीही केजरीवालांचे ‘एकला चलो’ का?

पाटकर यांनी पुढे म्हटले की, "गोवा हे तुमचे प्रयोग करण्याची जागा नाही. भाजपच्या हितसंबंधांची गुप्तपणे सेवा करत असताना गोव्याच्या अस्मितेचा आव आणू नका. तुमच्या 'नव्या राजकारणाची' स्क्रिप्ट आता उघड झाली आहे. तुम्ही फक्त मते विभाजित करण्यासाठी आणि गोव्याला कमकुवत करण्यासाठी येथे आला आहात. गोव्यातील लोकांनी तुमचे हे नाटक पाहिले आहे. आम्ही आमची भूमी, आमची भाषा आणि आमचे आत्मसन्मान जपणार.

नेत्यांचा राजीनामा 'फसवणूक आणि अहंकारामुळे'

पाटकर यांनी एका आणखी ट्विटमध्ये 'आप'च्या या फुटीचे कारण स्पष्ट केले. त्यांच्या मते, 'आप'चे आधारस्तंभ खुद्द केजरीवाल यांच्या उपस्थितीत कोसळले आहेत.

पाटकर म्हणाले, "त्यांचे नेते भीतीने नाही, तर फसवणूक, अहंकार आणि भाजपसोबतच्या गुप्त समजुतीमुळे बाहेर पडत आहेत. गोव्याने आपला निकाल दिला आहे. ज्यांनी 'नव्या राजकारणा'चा मुखवटा घालून आमचा आवाज विभाजित करण्यासाठी आणि आमच्या भूमीला कमकुवत करण्यासाठी येथे येतात, त्यांना आम्ही नाकारतो. गोवा नाटकाला बळी पडत नाही. गोवा सत्यासाठी उभा आहे."

केजरीवाल दौऱ्यावर असतानाच 'आप'ला मोठा धक्का

२०२७ मध्ये सरकार स्थापन करण्याची आशा बाळगून असलेल्या आम आदमी पक्षाला केजरीवाल राज्यात उपस्थित असतानाच मोठा धक्का बसला आहे. दक्षिण गोव्यातील 'आप'चे दोन मोठे नेते, बाणावलीचे पॉल लोबो आणि सॅटरनिनो रॉड्रिग्ज यांनी समर्थकांसह पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. 'आप'चे विद्यमान आमदार व्हेंझी व्हिएगस यांच्यासाठी हा राजीनामा मोठा धक्का मानला जात आहे. महत्त्वाच्या नेत्यांच्या राजीनाम्यामुळे 'आप'च्या संघटनात्मक बांधणीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com