Sudhin Dhavlikar Dainik Gomantak
गोवा

त्यावेळी कोळसा प्रदूषणात वाढ होणार हे माहीत नव्हते का? रेल्वे दुपदरीकरणाचा DPR काँग्रेसच्या काळात; ढवळीकरांचा घणाघात

Railway Double Tracking: पर्रीकरांनी रेल्वे मार्ग दुपदरीकरण प्रकल्पाला विरोध करीत हा प्रकल्प होऊ देणार नसल्याचे म्हटले होते. तरीही भाजप सरकारने हा प्रकल्प पुढे रेटला.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्यातील रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचे सरकार असतानाच तयार झालेला होता. तरीही काँग्रेस या प्रकल्पावरून भाजपवर नाहक आरोप करीत असल्यामुळे आपण काँग्रेसचा निषेध करीत असल्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

तर, रेल्वे मार्ग दुपदरीकरणानंतर राज्यात कोळसा हाताळणीत वाढ होणार नसल्याचा खोटा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत करीत असल्याची टीका काँग्रेस आमदार अॅड. कार्लस फेरेरा यांनी केली. दरम्यान, बुधवारी पत्रकारांनी याबाबत मंत्री ढवळीकर यांना छेडले असता, त्यांनी या विषयावरून आक्रमक झालेल्या काँग्रेसचाच निषेध केला. २००८-२००९ या काळात केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचे सरकार होते.

त्यावेळी आपणही राज्यातील सरकारात मंत्री होतो. त्याच काळात रेल्वे मार्ग दुपदरीकरण प्रकल्पाचा 'डीपीआर' तयार करण्यात आला होता. त्यावेळी या प्रकल्पामुळे कोळसा प्रदूषणात वाढ होणार हे काँग्रेसला माहीत नव्हते का, असा प्रश्न त्यांनी केला. त्यावेळी कोकण रेल्वेला ज्यांनी तीव्र विरोध केलेला होता.

आमदार कार्लस फेरेरा म्हणाले...

माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी रेल्वे मार्ग दुपदरीकरण प्रकल्पाला विरोध करीत हा प्रकल्प होऊ देणार नसल्याचे म्हटले होते. तरीही भाजप सरकारने हा प्रकल्प पुढे रेटला. आता या प्रकल्पामुळे कोळसा हाताळणीत वाढ होणार नसल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत सांगत आहेत.

परंतु, भाजप सरकार कायम खोटे बोलत असल्याचे याआधी कॅसिनोंसह इतर प्रकल्पांतूनही स्पष्ट झाले आहे. रेल्वे मार्ग दुपदरीकरण हा प्रकल्प पर्यटनवृद्धीसाठी असल्याचा खोटा दावा केंद्र आणि राज्य सरकारकडून केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT