
नवी दिल्ली: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी (०३ स्पटेंबर) नवी दिल्ली येथे केंद्रीय पोलाद आणि अवजड उद्योग मंत्री एचडी कुमारस्वामी यांची भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये गोव्याचा विकास, उद्योग-आधारित प्रगती आणि राष्ट्रीय विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
केंद्रीय पोलाद आणि अवजड उद्योग मंत्री एचडी कुमारस्वामी यांनी या बैठकीचा फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला आहे.
"आज गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी त्यांच्या नवी दिल्ली येथील कार्यालयात चर्चा झाली. देशाच्या विकास आणि प्रगतीच्या विविध मुद्यांवर आम्ही आपले विचार मांडले. सार्वजनिक सेवेसाठी समर्पित सहकाऱ्यांशी चर्चा करणे नेहमीच आनंददायी असते," असे कुमारस्वामी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
यापूर्वी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी (०२ सप्टेंबर) केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. पियुष गोयल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X द्वारे या बैठकीची माहिती दिली.
"गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भेट घेतली. यावेळी आम्ही राज्यातील विविध विकास उपक्रमांवर चर्चा केली. विकासाला चालना देणाऱ्या, गोव्याची निर्यात क्षमता वाढवण्यासाठी नवीन संधी निर्माण करणाऱ्या मुद्यांवर यावेळी चर्चा केली," असे गोयल यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले की, "केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्याशी नवी दिल्ली येथे बैठक झाली. आमची चर्चा गोव्याच्या व्यापार आणि उद्योगाला चालना देण्यावर केंद्रित होती. 'विकसित गोवा' आणि 'विकसित भारत २०४७' हे ध्येय साध्य करण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल," असे मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री सावंत जीएसटी बैठकीत भाग घेण्यासाठी दिल्ली दौऱ्यावर आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ५६ व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत मुख्यमंत्री सावंत यांनी भाग घेतला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.