Chief Minister Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

काँग्रेसने प्रचाराची खालची पातळी गाठली: मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत

दैनिक गोमन्तक

पणजी: काँग्रेसने प्रचाराची खालची पातळी गाठली आहे. स्व. मनोहर पर्रीकर यांच्याविषयी हीन दर्जाचे वक्तव्य करून काँग्रेसचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी काँगेसचे रूप दाखवले आहे. याबद्दल मी राज्याचा प्रमुख या नात्याने समस्त गोमंतकीय जनतेच्यावतीने दिगंबर कामत आणि फ्रान्सिस डिसोझा यांचा कडक शब्दात निषेध करतो, असे वक्तव्य मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी केले.

येथील निवडणूक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार विनय तेंडुलकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळेकर उपस्थित होते. गेल्या दहा वर्षांत भाजपाने राज्याचा केलेला विकास आणि कामे याची माहिती

देण्यासाठी ही पत्रकार परिषद बोलावण्यात आली होती.

राज्य सरकारने केलेल्या कामाचा आढावा घेताना मुख्यमंत्री यांनी सांगितले की, भाजपा सरकारने गेल्या दहा वर्षांत राज्याचा सर्वांगीण विकास केला. पर्रीकर यांच्या निधनानंतर पक्षाने माझ्यावर राज्याची जबाबदारी टाकली. माझ्या तीन वर्षांच्या कारकिर्दीत राज्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या. वीज, पाणी, रस्ते या पायाभूत सुविधांसह पूल, सरकारी शाळांची दुरुस्ती, सरकारी इस्पितळांचे आधुनिकीकरण करण्यात आले. प्रशासकीय कामात पारदर्शकता आणली. केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजना सर्व घटकांपर्यंत पोहोचवल्या. कोरोना महामारीच्या कठीण काळात कोणतीही सामाजिक योजना बंद पडू दिली नाही, असे ते म्हणाले.

भाजपाला किती जागा मिळतील, असे विचारले असता ते म्हणाले, आम्ही २२ प्लसचा संकल्प केला आहे. पण एकूणच राज्यातील लोकांचा रागरंग पाहाता आम्ही त्यापेक्षा अधिक जागा घेऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा साध्य करण्यासाठी गोमंतकीय जनतेने भाजपाच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

काँग्रेसला टीका करायची तर त्यांनी आमच्यावर करावी. पक्षावर करावी. पण दिवंगत झालेल्या पर्रीकर यांच्या सारख्या नेत्यावर भाष्य करणे निषेधार्ह आहे. राज्याच्या विकासात स्व. पर्रीकर यांचे मोठे योगदान आहे. तसेच संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी केलेले कार्य संपूर्ण देशाला माहीत आहे. तरीही त्यांच्याविषयी अशा पद्धतीने सार्दिन यांच्यासारख्या नेत्याने शब्द वापरणे हीन दर्जाचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

शाळकरी मुलांच्या बाबतीत आपण किती जागरूक, शिक्षित आणि गंभीर आहोत?

विजयनगर साम्राज्य, गोव्याचा संदर्भ; मदुराई आणि कुमार कंपण्णांचा इतिहास याबद्दल जाणून घ्या

Top Most Polluted Countries: जगातील 'हे' 8 देश सर्वाधिक प्रदूषित; क्रमवारीत भारत तिसऱ्या क्रमांकावर!

Goa Politics: दिल्लीत नेमके 'काय' घडले? 'कुणाला' समज, 'कुणाला' आदेश..

SCROLL FOR NEXT