CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant : एकाित्मक शेतीकडे युवकांनी वळावे

राज्यात सर्व पिकांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न

गोमन्तक डिजिटल टीम

CM Pramod Sawant : राज्यातील सर्व प्रकारच्या पिकांना बाजारपेठ मिळवून देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे. त्यासाठी विशेषतः युवकांनी आपली नोकरी सांभाळत शेतीकडे लक्ष द्यावे. सामाजिक तसेच एकत्रित शेतीची संकल्पना सरकारने उपलब्ध करून दिली आहे, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हरवळे येथे केले.

हरवळेत स्वयंपूर्ण गोवा अंतर्गत उपजिविका कार्यक्रम झाला. सरपंच अंकुश मळीक, लुपीन फाऊंडेशन प्रा. ली. चे सीएसआर साईट हेड श्रीनिवास कालाकुनटका, सल्लागार समीतीचे अध्यक्ष के. प्रकाश, स्वयंपूर्ण मित्र सतीश वागोणकर, पंचसदस्य राजू मळीक, नंदिनी नाईक, संजय नाईक, प्रजानन नाईक बोरकर उपस्थिती होते.

खासगी नोकऱ्यांची संधीही स्वीकारा

आज विविध गोष्टींसाठी इतर राज्यांवर अवलंबून आहे. सरकारी मदत, कुशलता, सुपीक जमीन असूनही लोकांचा पैसा बाहेर जात आहे. ही बाब गांभीर्याने विचार करण्यासारखी असून स्वयंपूर्ण गोवा संकल्पानेखाली विविध प्रकारची पिके घेण्याची तयारी ठेवावी.

सरकारी नोकरीप्रमाणेच खासगी नोकरदारांनीही सोयी सुविधा देण्याचा नियम अंमलात आणला आहे. त्यासाठी केवळ सरकारी नोकरीचाच हट्ट न धरता खासगी नोकरीची संधी स्वीकारा, असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: महाराष्ट्रात मिळालेलं यश अभूतपूर्व आहे - सुलक्षणा सावंत

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT