Cm Meeting On Sattari Fire  Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant : दोषी वन अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करणार

उच्चस्तरीय बैठकीनंतर आगीच्या सर्व दुर्घटनांच्या चौकशीचे आदेश

दैनिक गोमन्तक डिजिटल

गेल्या पाच दिवसांपासून आगीचे तांडव पसरलेल्या सत्तरीची अखेर प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज मोर्ले येथे उच्चस्तरीय बैठक बोलावून प्रशासनाची झाडाझडती घेतली.

आतापर्यंत घडलेल्या आगीच्या सर्व घटनांची चौकशी करून दोषी वन अधिकारी आणि गार्डवर कारवाईचे सक्त आदेश त्यांनी दिले आहेत. मोर्ले गडावर लागलेली आग विझविण्यासाठी वन विभाग, अग्निशमन दल, आपत्कालीन यंत्रणा आणि स्थानिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करत मुख्यमंत्र्यांनी आग लावू नका, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा सज्जड दम भरला आहे.

शुक्रवारपासून सत्तरीत अग्निकांडाला सुरुवात झाली. प्रामुख्याने म्हादईच्या खोऱ्यासह अभयारण्यात या दुर्घटना घडत असल्याने मुख्यमंत्र्यांनी आज मोर्ले येथील सांस्कृतिक भवनमध्ये उच्चस्तरीय बैठक बोलावून सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

यावेळी वनमंत्री विश्‍वजीत राणे, पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे, मुख्य सचिव पुनितकुमार गोयल, मुख्य प्रधान वनसंरक्षक राजीवकुमार गुप्ता, अग्निशमन आणि आपत्कालीन विभागाचे संचालक नितीन रायकर, पोलिस महानिरीक्षक ओमवीरसिंग बिष्णोई, पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

यावेळी प्रशासकीय यंत्रणेसह झालेल्या चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, ‘आग लावू नका, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील’, असा इशारा दिला.

ते म्हणाले, ज्या बीटमध्ये या दुर्घटना घडत आहेत, त्या सर्व वनरक्षकांची सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.

आज आणखी अधिकारी तैनात

मोर्ले गडावरील आग आता पसरत आहे. त्याची भीषणताही वाढली आहे. सध्या वन विभागाचे 35 ते 40 कर्मचारी तेथे तैनात केले आहेत. सकाळी आणखी वन विभाग अधिकाऱ्यांसोबत स्थानिक नागरिक, अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT