Holi 2023: रंगपंचमीनंतर आंघोळीसाठी गेलेल्या दोघांना जलसमाधी

रंगाचा बेरंग : वास्कोमध्ये होलिकोत्सवाला दु:खाचे गालबोट
One drowned while celebrating Sao Joao in goa
One drowned while celebrating Sao Joao in goaDainik Gomantak

Goa Holi 2023: रंगपंचमी उत्साहात साजरी केल्यानंतर समुद्रात आंघोळीसाठी गेलेल्या दोघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे होलिकोत्सवाच्या आनंदाला दु:खाचे गालबोट लागले. सडा आणि बायणा येथे या धक्कादायक घटना घडल्या.

मुरगाव-सडा येथील जापनीज गार्डनजवळच्या समुद्रात रंगपंचमी साजरी करून आंघोळ करताना 18 वर्षीय शुश्रूत अशोक सातार्डेकर याचा बुडून मृत्यू झाला, तर बायणा येथे समुद्रात आंघोळ करताना 40 वर्षीय इसमाचा बुडून मृत्यू झाला.

शुश्रूतला प्रसंगावधान राखून इतर लोकांनी त्याला पाण्याबाहेर काढले. त्याला त्वरित उपचारासाठी दाबोळी-चिखली उपजिल्हा इस्पितळात आणले असता, येथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मुरगाव पोलिसांनी या दोन्ही घटनांचा पंचनामा केला.

One drowned while celebrating Sao Joao in goa
Govind Gaude: म्हापशातील रवींद्र भवन प्रकल्प कुचेलीत हलवणार

बुडलेल्या इसमाची ओळख पटेना

दुसऱ्या घटनेत रंगपंचमीनंतर बायणा समुद्र किनारी आंघोळ करण्यास गेलेल्या एका 40 वर्षीय इसमाचा बुडून मृत्यू झाला. या इसमाची ओळख अद्याप पटलेली नाही.

मुरगाव पोलिसांनी दोन्ही घटनांचा पंचनामा केला. याप्रकरणी मुरगाव पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक आदित्य नाईक गावकर पुढील तपास करीत आहेत. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात पाठवले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com