CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: पर्यटकांनी कायदा हातात घेऊ नये, केवळ 100 नंबर डायल करावा...

मुख्यमंत्र्यांचे आवाहन; हणजुणेतील घटनेत पर्यटकाने आधी दगड फेकून मारला

Akshay Nirmale

CM Pramod Sawant: हणजुण (Anjuna) येथे पर्यटकावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याची राज्य सरकारने तातडीने दखल घेतली आहे. काल रविवारी हा प्रकार घडल्याचे समोर आल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोलिसांना दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर आज, सोमवारी पुन्हा मुखय्मंत्र्यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणाविषयी माहिती दिली.

या प्रकाराबाबत बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, संशयित आरोपींवर कलम 307 लावण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. संबंधित पोलिस अधिकाऱ्याला आज संध्याकाळपर्यंत निलंबित केले जाईल, त्याची पोलिस खात्यामार्फत चौकशी केली जाईल.

हॉटेल व्यवस्थापकानेही पोलिसांना ही माहिती द्यायला हवी होती. स्थानिक किंवा पर्यटकांनीही कायदा हातात घेता कामा नये. पर्यटकाने आधी संशयितांना दगड फेकून मारला. त्यानंतर संतप्त झालेल्या संशयितांनी चाकुने हल्ला केला. पर्यटकांनी कायदा हातात घेऊ नये, त्यांनी 100 नंबर डायल करावा.

दरम्यान, हे पर्यटक कुटुंबीय दिल्लीतून आले होते. एका रिसॉर्टच्या बाहेर चार स्थानिक युवकांनी त्यांच्यावर सुरीने प्राणघातक हल्ला केला. या प्रकरणी हणजूण (Anjuna) पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

पीडितांनी घटनेचा व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर पोलिसांनी सहा दिवसांनी कलम 307 नुसार गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली.

रॉयस्टन रेजिनाल्डो डायस, त्याचा भाऊ नायरॉन रेजिनाल्डो डायस (दोघे रा. डिमेलो वाडा, हणजुण) व काशिनाथ विश्‍वोर आगरवाडेकर (सोरांतो वाडा, हणजुण) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. चौथा संशयित सलीम कासीम फरारी आहे.

या प्रकरणी हलगर्जीपणा केल्यामुळे तपास अधिकारी उपनिरीक्षक फ्रान्सिस्को झेव्हियर यांची बदली केली गेली आहे. त्यांची रवानगी आता उत्तर गोवा राखीव पोलिस पथकात केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT