Mallikarjun Temple Goa : मल्लिकार्जुन देवाचा शिर्षारान्नी, जत्रोत्सव; भाविकांचा महापूर

दिवजोत्‍सवात शेकडो महिलांचा सहभाग; गुलालोत्सवही उत्‍साहात साजरा
Mallikarjun Temple Goa
Mallikarjun Temple GoaDainik Gomantak
Published on
Updated on

श्रीस्थळ-काणकोण येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थानचा पारंपरिक शिर्षारान्नी व वार्षिक जत्रोत्सव आज रविवारी मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा झाला. गोव्‍यासह महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या विविध भागांतील कुळावी व भक्तगणांनी उत्‍सवाला प्रचंड गर्दी केली होती.

देवस्थानच्या चौकावरील कौल व पेन्नोटीतील विधीनंतर शिर्षारान्नी व जत्रोत्सव आज रात्री 12 पूर्वी साजरा होणार आहे. काल शनिवारी सकाळी सर्व सुहासिनी महिला पारंपरीक दिवजांसह श्री मल्लिकार्जुन देवाच्या प्रांगणात तसेच किंदळे-खालवडे येथील निराकार देवस्थानात, दिवजांच्या भोवरीत (मिरवणुकीत) मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

युवा वर्गानेही उत्साह दाखविला. वेळीप, किंदळेकर देसाई गावकर व नगर्सेकर देसाई गावकर यांच्या तिन्ही भोवरी झाल्यावर बोळये व किन्नरकरांच्या मुलांचे कान टोचणे व मुलींना सुपली देण्याचा कार्यक्रम झाला.

रात्री ८ वाजता पालखीतून श्रींची मिरवणूक व नंतर देव व खोलकर बंधूंचे सुवारीवादन, गुलालोत्सव साजरा केला गेला.

प्रसिद्ध षष्ठीच्‍या जत्रेनिमित्त आज भल्या सकाळी कुळावी, महाजन व भक्तगणांनी देवस्थानात गर्दी करायला सुरवात केली होती. श्रींच्या दर्शनार्थ लांब रांगा‌ संध्याकाळपर्यंत लागल्या होत्या. लग्नानंतर देवदर्शनापूर्वी करायचा हा विधी शेलची भोवर सकाळी झाली.

भोंवरी झाल्यावर ११च्या सुमारास श्रींस भक्तगणांकडून स्वखुषीने तुलाभार अर्पण केला गेला. यामध्ये त्या-त्या भक्ताच्या वजना एवढ्या वस्तू तोलून दिल्या जातात. त्‍यामध्ये केळी, शहाळी, साखर, तांबे व अन्य वस्‍तू असतात.

दरम्‍यान, कार्यक्रम यशस्वी करण्‍यासाठी देवस्थान समिती अध्यक्ष, अन्य पदाधिकारी व महाजनांनी परिश्रम घेतले. वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी गोवा पोलिसांना बरीच मेहनत घ्यावी लागली. उपस्थित सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

आधाराविना तरंगे राहतात उभी

दुपारी २ वाजता प्रसिद्ध शिर्षारान्नी उत्सव अवतारास सुरवात झाली. यावेळी अवतार पुरुषाची तरंगे कशाचाही आधार न घेता जमिनीवर उभी राहतात. त्यानंतर विधींना सुरवात होऊन ३-१५ वाजता प्रत्यक्ष कौलप्रसाद द्यायला सुरवात झाली.

सर्वप्रथम प्रमुख नेमेली, वांगडी व अन्य प्रमुखांना कौलप्रसाद मिळाला. दोन वर्षांनी येणाऱ्या या उत्सवास मोठ्या संखेने भाविक उपस्‍थित होते.

सभापती रमेश तवडकर, मंत्री माविन गुदिन्हो, सुभाष फळदेसाई, आमदार विजय सरदेसाई, माजी खासदार नरेंद्र सावईकर, जिल्हा पंचायत सदस्य शाणू वेळीप, माजी आमदार दामोदर नाईक, नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर, प्रदेश भाजप सचिव सर्वानंद भगत, गोवा फॉरवर्डचे विकास भगत यांनीही उपस्थिती लावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com