Pramod Sawant Meet Govind Gaude Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Govind Gaude: ‘भाजपनेच अनुसूचित जमातींचा विकास केला आहे. भाजपने पोषक वातावरण निर्माण केले. त्‍याचा लाभ भलतेच लोक घेऊन गेले’, असे म्‍हणत सभापती रमेश तवडकर यांनीही अप्रत्‍यक्षरित्‍या गावडेंवर निशाणा साधला.

Sameer Panditrao

समाज कल्याण संचालनालयातर्फे सांगे येथील पालिका सभागृहात आयोजित जनजातीय गौरव वर्षनिमित्त ‘धरती आभा जनभागीदारी अभियान’चे केंद्रीय मंत्री तथा आदिवासी व्‍यवहार मंत्री जुअल ओरम यांच्या हस्ते समई प्रज्वलित करून उद्‌घाटन करण्यात आले.

त्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर सभापती रमेश तवडकर, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, राज्यसभा खासदार सदानंद तानावडे, आमदार गणेश गावकर, जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस, माजी आमदार वासुदेव मेंग गावकर, नगराध्यक्षा संतीक्षा गडकर, संचालक दीपक देसाई, जिल्हा पंचायत सदस्य, सुरेश केपेकर, आणि मान्यवर उपस्थित होते.

मुख्‍यमंत्री पुढे म्‍हणाले, ‘स्वयंपूर्ण गोवा’अंतर्गत अंत्योदय तत्त्‍वावर शेवटच्या घटकापर्यंत सुलभ शौचालय, नळपाणी, वीज सेवा देत, आदिवासी समाजासोबत इतर समाजांना उपयुक्त योजना देण्याचे काम आपले सरकार करीत आहे.’ केंद्रीय मंत्री ओरम यांनी मोदी सरकारच्‍या उपलब्‍धीविषयी माहिती दिली.

१० हजारांपैकी साडेतीन हजार सनदांची पूर्ती : मुख्यमंत्री

अनुसूचित जमातींसाठी भाजप सरकारने काय केले, असे कोणी विचारत असेल तर ते दुर्दैवी आहे.

पूर्वी १० हजार जणांना सनदा मिळणे बाकी होते. आपले घर नियमित कधी होईल, याची आस होती.

माझ्‍या कारकिर्दीत साडेतीन हजार कुटुंबांना सनदा देण्‍यात आल्‍या, उर्वरितही मार्गी लागत आहेत.

ट्रायबल कमिशन स्‍थापन झाले. ट्रायबल रिसर्च सेंटर तयार केले, कुणबी गाव निर्माण केले.

रमेश तवडकर म्‍हणाले...

‘भाजपनेच अनुसूचित जमातींचा विकास केला आहे. भाजपने पोषक वातावरण निर्माण केले. त्‍याचा लाभ भलतेच लोक घेऊन गेले’, असे म्‍हणत सभापती रमेश तवडकर यांनीही अप्रत्‍यक्षरित्‍या गावडेंवर निशाणा साधला. पुढील पाच वर्षांत एसटींच्‍या विकासाची भाजप सरकारकडे योजना आहे’, असेही ते म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT