pravin arlekar babu ajgaonkar
AAP Leader Amit PalekarDainik Gomantak

Goa Politics: 'गांजा'वरुन आरोप करणाऱ्या विद्यमान आणि माजी आमदारांची चौकशी करा; 'आप' नेते पालेकरांची मागणी

Goa AAP Leader Amit Palekar: माजी आमदार बाबू आजगावकरांनी पेडण्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असल्याचा आरोप करत आमदार प्रवीण आर्लेकरांना यासाठी जबाबदार धरले होते.
Published on

पेडणे: पेडणेचे माजी आमदार बाबू आजगावकर व विद्यमान आमदार प्रवीण आर्लेकर यांनी काल एकमेकांवर गांजाविक्रीचा आरोप केल्याचे पडसाद उमटू लागले आहेत. मुख्यमंत्र्यांनी विधानांची दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी 'आप'चे नेते अमित पालेकर यांनी केली आहे.

"दोन्ही नेते भाजपचे आहेत. त्यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. 'एएनसी'ने त्या संदर्भात तपास करावा," असे अमित पालेकर म्हणाले. 'मिशन फॉर लोकल'तर्फे राजन कोरगावकर यांनीही चौकशीची मागणी केली आहे दरम्यान, पेडणे भाजप मंडळाने आजगावकर यांचा दावा फेटाळून लावला आहे.

pravin arlekar babu ajgaonkar
Widow Pension: विधवांना गोवा सरकारचा मोठा दिलासा; दरमहा मिळणार 4,000 रुपये, निवृत्तीवेतनासह गृहआधाराचाही लाभ

माजी आमदार बाबू आजगावकरांनी पेडण्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असल्याचा आरोप करत आमदार प्रवीण आर्लेकरांना यासाठी जबाबदार धरले. गांजा विकणारा माणूस आमदार झाला असल्याचा आरोप देखील यावेळी आजगावकरांनी केला होता.

अॅसिड हल्ल्याच्या घटना गंभीर घटना असल्याचे म्हणत यापूर्वी असा प्रकार पेडण्यात घडला नसल्याचे आजगावकर म्हणाले. तसेच, २०२७ची निवडणूक लढण्याची इच्छा देखील त्यांनी बोलून दाखवली.

आजगावकरांच्या आरोपाला उत्तर देताना प्रवीण आर्लेकरांनी देखील त्यांच्यावर जोरदार टीका केली. आजगावकरांचा मुलगाच डिस्कोत गांजा विक्री करतो असा आरोप आर्लेकरांनी केला. तसेच, पेडण्यातील कायदा सुव्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या आजगावकरांनी डोके तपासून घ्यावे असेही आर्लेकर म्हणाले. त्यांच्या निवडणूक लढण्याने काही अडचण नसल्याचे आर्लेकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com