Goa Mining Business: खाण आणि भूगर्भशास्त्र खात्याने जाहीर केलेल्या ई-लिलावातील यशस्वी बोलीधारकांकडून यासंबंधीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये राज्यातील खनिज व्यवसाय सुरू होईल, अशी माहिती खाण संचालक डॉ. एस. शानभोग यांनी महिन्याच्या सुरुवातीला दिली होती.
यावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही लवकरच खाण व्यवसाय सुरू होणार असल्याचे सांगितले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, यावर्षी राज्यातील खाण आणि संबंधित व्यवसाय सुरू होतील. जे कुणी खाण व्यवसायात गुंतवणूक करण्याची वाट बघत आहेत, त्यांच्यासाठी आता योग्य वेळ आली आहे.
शाश्वत खाण व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. पुढील 7-8 वर्षात 100 टक्के क्षमतेने व्यवसाय चालवला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
30 दशलक्ष टन मर्यादा
न्यायालयाने 30 दशलक्ष टन खनिज उत्खननाची मर्यादा घातली आहे. सरकार सुरुवातीला सुमारे 40 खाण लीजांचा लिलाव करणार आहे. शिवाय अगोदर झालेल्या लिलावात घेतलेले, मात्र डंप करून ठेवलेले व हलवण्याची मुदत संपलेले खनिज ताब्यात घेतले आहे. त्या खनिजाची ई-लिलाव प्रक्रिया सुरू आहे, असेही ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.