Ganesh Chaturthi: गणेशोत्सव काळात अनुचित प्रकार घडू नये यासाठी द. गोवा पोलीस सज्ज; नागरिक, गणेश मंडळांना आवाहन

गणेशोत्सवासाठी राज्यात बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू आहे
Ganesh Chaturthi in Goa
Ganesh Chaturthi in GoaDainik Gomantak

Ganesh Chaturthi in Goa: गणेशोत्सवासाठी राज्यात बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू आहे. दरम्यानच्या काळात कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी गोवा पोलीस सतर्क झाले आहेत. या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांना सुरक्षिततेच्या दृष्टीने काही आदेशही देण्यात आले आहेत.

Ganesh Chaturthi in Goa
Ganesh Chaturthi: वास्को- डिचोलीत माटोळी बाजार फुलले, सजावट साहित्य खरेदीसाठी गर्दी

दक्षिण गोवा पोलिसांनी गणेश चतुर्थी उत्सवाच्या सुरक्षेची तयारी पूर्ण केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जनतेला त्यांच्या परिसरात सतर्कता राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करून, पोलिसांनी लोकांना मौल्यवान वस्तू घरातच ठेवण्याबाबत सावध केले आहे.

गणेश चतुर्थीला अनेकजण आपल्या मूळ गावी जातात. त्या दरम्यान चोरीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ होते. हे लक्षात घेता नागरिकांनी घराबाहेर पडताना पोलिसांना तसेच त्यांच्या शेजाऱ्यांनाही माहिती द्यावी, जेणेकरुन कोणतीही घटना घडल्यास वेळीच मदत करता येईल, असा सल्ला दक्षिण गोवा पोलिसांनी दिला आहे.

गणेशोत्सवाच्या काळात, सुरक्षा आणि बंदोबस्त बळकट करण्यासाठी पुरेसा फौजफाटाही तैनात केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले. याबबात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाही पोलिसांनी उत्सवाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासह पुरेशा सुरक्षेच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा तसेच विद्युत विभागाकडून उत्सव परिसरातील आग किंवा इतर धोक्यांबाबत सुरक्षिततेच्या दृष्टीने तपासणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com