Bondvol Lake: बोंडवेल तलावाला संरक्षण कवच! 200 मीटरमध्ये बांधकामास परवानगी नाही; मंत्री राणेंचे स्पष्ट निर्देश

Vishwajit Rane: २०० मीटर परिघातामध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश राणे यांनी नगर नियोजन खात्याला दिले आहेत.
Bondvol Lake
Bondvol LakeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पाणथळ प्राधिकरणाकडून (वेटलँड ॲथोरिटी) सांताक्रूझच्या बोंडवेल तलावाच्या पाणलोट क्षेत्राचा विषय सोडविला जात नाही, तोपर्यंत नगर नियोजन खात्यातर्फे तलावाच्या २०० मीटर परिघातामध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश नगर नियोजन मंत्री विश्वजित राणे यांनी नगर नियोजन खात्याला दिले आहेत.

बोंडवेल तलाव व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आर्थुर डिसोझा, माजी उपसरपंच तथा सदस्य इनासियो पेरेरा व इतर ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने सोमवारी मंत्री राणे यांची भेट घेतली. नगर नियोजन मंत्री राणे यांनी तळ्याविषयी ठोस आश्वासन शिष्टमंडळाला दिले. त्याचबरोबर याविषयी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनाही या निर्णयाची माहिती दिली जाईल, असे राणे यांनी नमूद केले.

Bondvol Lake
Bondava Lake in Santacruz: सांताक्रुझचे बोंडवेल तळे का आटले; आमदार फर्नांडिस यांची चौकशीची मागणी

तत्पूर्वी राणे म्हणाले, बोंडवेल तळ्याचा बफर झोन निश्चित करण्याची जबाबदारी पाणथळ प्राधिकरणाची आहे. बफर झोनचा निर्णय पाणथळ प्राधिकरण घेते. त्यामुळे २०० मीटर असलेल्या बफर झोनमध्ये कोणतेही बांधकाम होणार नाही. बोंडवेल तलावाच्या परिसरात २०० मीटरऐवजी तो १५० मीटर करण्याची मागणी होत आहे. त्याचा निर्णय नगर नियोजन खात्याच्या बैठकीत होईल.

Bondvol Lake
Chimbel Survey: चिंबलमधील 'तोयार'चे सर्वेक्षण पूर्ण! सरकारकडे अहवाल होणार जमा; मुख्‍यमंत्र्यांच्‍या भूमिकेकडे लक्ष

बोंडवेल तलावाच्या परिसरात कूपनलिकेचे काम सुरू असल्याचे ग्रामस्थांनी राणे यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर बोअरवेलला मान्यता नगर नियोजन खाते देत नाही, असे सांगून ते म्हणाले, तर बोंडवेल तलावाच्या परिसरात खोदकाम सुरू असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी मंत्री राणे यांना लक्षात आणून दिले. त्यावर त्यांनी नगरनियोजन खाते याप्रमाणे मान्यता देते. लोकांच्या हिताचा विचार करून सरकारने कायदे तयार केल्याचे राणे यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com