Arambol: हरमलमध्ये पोलिसांची धडक कारवाई! 24 तासांत अडकलेल्या 13 मुलींची सुटका; राज्यात खळबळ

Arambol Human Trafficking: या टोळीचा मुख्य संशयित मांद्रे समुद्रकिनाऱ्यावर अन्य व्यवसायाच्या आडून कारभार करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
Arambol Human Trafficking
Arambol Human TraffickingDainik Gomantak
Published on
Updated on

हरमल: ग्रामस्थांनी पोलिस व पंचायतींना निवेदन दिल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत मांद्रे पोलिसांनी धडक कारवाई करत वेश्या व्यवसायात अडकलेल्या १३ मुलींची सुटका केली. सोमवारी रात्री सुमारे ९ वाजता ८ मुलींची, तर रविवारी पहाटे ३ वाजता ५ मुलींची सुटका करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

या कारवाईत पेडणेचे पोलिस अधीक्षक सलीम शेख, मांद्रे पोलिस निरीक्षक गिरेंद्र नाईक तसेच इतर अधिकाऱ्यांचा सहभाग होता. माजी सरपंच इनासियो डिसोझा व ग्रामस्थांनी पोलिसांचे आभार मानले असून कारवाई सातत्याने सुरू ठेवावी, अशी मागणी केली आहे.

Arambol Human Trafficking
Arambol: 'परप्रांतीय घरात घुसले आणि... '! दलाल, बेकायदा गोष्टींमुळे हरमलवासीय संतप्त; कायदा हातात घेण्याचा दिला इशारा

या टोळीचा मुख्य संशयित मांद्रे समुद्रकिनाऱ्यावर अन्य व्यवसायाच्या आडून कारभार करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यालाही तात्काळ ताब्यात घ्यावे, अशी मागणी पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.

Arambol Human Trafficking
Arambol Crime: हरमल हादरले! हात बांधले, धारदार शस्त्राने केला मानेवर वार; खूनप्रकरणी संशयित रशियन आरोपीला अटक

सर्व मुली परराज्यातील असून त्यांना मांद्रे पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे. सामाजिक संस्थेच्या सहकार्याने पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना सुधारगृहात पाठविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com