CM Pramod Sawant In Saligao  Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant In Saligao: 410 गावांत सामान्य सेवा केंद्रे : मुख्यमंत्री सावंत

विविध उपक्रमांनी सुवर्णमहोत्सवी वाढदिवस, शुभेच्‍छांचा वर्षाव

दैनिक गोमन्तक डिजिटल

CM Pramod Sawant In Saligao: ‘राज्याला सर्वच क्षेत्रांत स्वयंपूर्ण बनविण्यासाठी ‘स्वयंपूर्ण गोवा २.०’ उपक्रमांतर्गत ४१० महसूल गावांमध्ये सामान्य नागरिक सेवा केंद्रांची स्थापना करण्यात येईल’, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज केली.

मुख्यमंत्र्यांनी आपला सुवर्ण महोत्सवी वाढदिवस ‘सेवा, सुशासन आणि जनकल्याण’ या तत्त्वानुसार आज दिवसभर विविध उपक्रमांमध्ये भाग घेत साजरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून विविध स्‍तरांवरून मुख्‍यमंत्र्यांवर शुभेच्‍छांचा वर्षाव झाला.

सकाळी श्री लईराई देवीच्या दर्शनाने सुरू झालेल्या या कार्यक्रमांची सांगता साखळी येथील श्री राधाकृष्ण मंदिरातील धार्मिक विधींनी झाली. सकाळी १० वाजता ‘स्वयंपूर्ण गोवा २.०’ अंतर्गत प्रशासनाच्या वतीने साळगाव येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

त्‍यात मुख्यमंत्र्यांनी स्वयंपूर्ण मित्र बनून साळगावच्या समस्या जाणून घेत त्या निराकरण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लाडली लक्ष्मी योजनेच्या सर्व लाभार्थींना तीन महिन्यांत पैसे मिळतील, असे जाहीर केले.

‘लाडली लक्ष्‍मी’चे अर्ज तीन महिन्‍यांत निकाली

रोजगारासाठी उचलले पाऊल

  • ‘स्वयंपूर्ण २.०’ अंतर्गत गोव्यातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षण आणि स्टार्ट अप्सला प्रोत्साहन दिले जाईल.

  • रोजगार उपलब्‍धीसाठी सरकारने आयटीआय व पॉलिटेक्निकशी खास सामंजस्य करार केलेला आहे.

  • सेल्फ हेल्प ग्रुप्सना नियमित प्रशिक्षण व कोल्ड स्टोरेज साखळी मजबूत करण्‍यावर आमचा भर आहे.

  • अकादमी आणि उद्योग यांच्यातील दरी कमी करण्‍यावर लक्ष केंद्रित केले जाईल.

  • इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा येथील सेवा संगम, शिक्षा संगम कार्यक्रमात महत्त्‍वाची माहिती देण्‍यात आली.

विकास आवश्‍यक

साळगाव येथे विविध योजनांच्या लाभार्थींना त्या-त्या योजनांच्‍या कार्ड्सचे वितरण करण्यात आले. शिवाय मुख्यमंत्र्यांनी फळे आणि फुलांची रोपटी उपस्थितांना वितरित केली.

‘अंत्योदय पद्धतीने तळागाळातील लाभार्थींपर्यंत सरकारच्या योजना पोहोचल्या पाहिजेत. यासाठी आपण सक्रिय राहावे. गावांचा विकास झाला तर तो राज्याच्या विकासाला हातभार ठरणार आहे’, असे आवाहन त्यांनी स्वयंपूर्ण मित्रांना केले.

श्री देवी लईराई, मिलाग्रीसचे दर्शन

मुख्यमंत्री सावंत यांच्या वाढदिनीच शिरगावच्या श्री लईराई देवीचा जत्रोत्सव आणि म्हापशाच्या मिलाग्रीस सायबिणीचे फेस्तदेखील होते. हा अनोखा योगायोग साधत मुख्यमंत्री सावंत यांनी आज सकाळी पत्नी, मुलीसह श्री देवी लईराईचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. तसेच म्हापशातील मिलाग्रीस सायबिणीचेही दर्शन घेतले.

पक्षातर्फे जाहीर सत्कार

मुख्यमंत्र्यांच्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्त भाजपने विविध उपक्रम राबवत पणजीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भाजप मुख्यालयाच्या खाली उभारलेल्या विशेष व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

तत्पूर्वी त्यांनी लोकांची गाऱ्हाणी ऐकून घेत शुभेच्छा स्वीकारल्या. यावेळी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मंत्री, आमदार, पक्षनेते, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

"गोव्याचे कष्टाळू मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आपणाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या नेतृत्वाखाली गोवा प्रगतीची नवनवीन शिखरे गाठत आहे. आपल्या दीर्घायुष्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना."

नरेंद्र मोदी, पंतप्रधान

"गोव्यातील लोकांच्या कल्याणासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची तळमळ आणि बांधिलकी खरोखरच उल्लेखनीय आहे. वाढदिनानिमित्त आपल्याला दीर्घायुष्य लाभो, अशी मी प्रार्थना करतो."

अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: गोमेकॉत नाकातून मेंदूची शस्त्रक्रिया लवकरच सुरु होणार; गोमंतकीय रुग्णांना मिळणार मोफत उपचार!

Maharashtra Election: निवडणूक बंदोबस्तातील गोवा पोलिसाचं मुंबई 'पर्यटन'; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला...

Goa News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही, मुख्यमंत्री स्पष्टच बोलले! वाचा दिवसभरातील ठळक घडामोडी

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

SCROLL FOR NEXT