Nitin Nabin and cm pramod sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: नितीन नवीन भाजपचे 'बिग बॉस', मुख्यमंत्री सांवतांकडून कौतुकाचा वर्षाव; आगामी निवडणुका जिंकण्याचा केला निर्धार

Nitin Nabin Big Boss of BJP: गोव्याच्या राजकीय वर्तुळात सध्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या दोन दिवसीय दौऱ्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

Manish Jadhav

पणजी: गोव्याच्या राजकीय वर्तुळात सध्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या दोन दिवसीय दौऱ्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष मेळाव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नितीन नवीन यांचे अतिशय कौतुकास्पद आणि वजनदार शब्दांत वर्णन केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदा नितीन नवीन यांना उद्देशून 'तुम्ही माझे बॉस आहात' असे म्हटले होते. मात्र, नितीन नवीन हे आता खऱ्या अर्थाने 'भाजपचे बिग बॉस' (Big Boss of BJP) आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांनी टाळांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नितीन नवीन यांच्या नेतृत्वावर आणि संघटनात्मक कौशल्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला. आगामी काळात गोव्यात होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये भाजपला विजय मिळवून देण्यासाठी नितीन नवीन यांची रणनीती अत्यंत महत्त्वाची ठरेल, असे सावंत यांनी नमूद केले. त्यांच्या अनुभवी मार्गदर्शनाखाली पक्ष अधिक मजबूत होईल आणि आम्ही सर्व निवडणुका जिंकू, असा ठाम विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला. नितीन नवीन यांची कामाची शिस्त आणि त्यांचा दांडगा जनसंपर्क पाहता, त्यांच्या रुपाने भाजपला (BJP) एक सक्षम मार्गदर्शक मिळाला असल्याची भावना व्यक्त होत आहे.

नितीन नवीन यांच्या या गोवा दौऱ्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये कमालीचे चैतन्य पाहायला मिळत आहे. विशेषतः आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांशी साधलेला संवाद आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेली 'बिग बॉस' ही पदवी सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल होत आहे. विरोधकांच्या आव्हानांना परतवून लावण्यासाठी आणि सरकारी योजना घराघरात पोहोचवण्यासाठी भाजप आता 'बिग बॉस'च्या आदेशानुसार नवी रणनीती आखणार असल्याचे या दौऱ्यातून स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: झोप ठरली जीवघेणी...! ट्रक खाली झोपलेल्या अज्ञात व्यक्तीचा चिरडून मृत्यू; करासवाडा येथील घटनेनं हादरला गोवा

Seaweed Forests: गोव्याच्या किनाऱ्यावर 'समुद्री शेवाळाची जंगले' आहेत, ही जाणीव लोकांमध्ये निर्माण व्हायला हवी..

Crime News: घरातच बनवली 'स्मशानभूमी'! आई-वडिलांना मारुन मुलानं घरातच गाडलं; बहिणीच्या प्रेमप्रकरणातून संपवलं संपूर्ण कुटुंब

‘आमचे गोंय आमकां जाय, तुमी भायले तुमच्या देशान वचात’! पोर्तुगीज पोलिसांनी फुटक्या ‘काऊटेल’ चाबकानं अक्षरश: फोडून काढलं..

Goa Congress: काँग्रेस गोव्यात आक्रमक होऊ शकेल?

SCROLL FOR NEXT