Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: विद्यार्थ्यांनो नोकरी शोधण्याऐवजी रोजगार निर्माण करा; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Amazing Goa Global Business Conference: मेझिंग गोवा जागतिक व्यावसायिक परिषदेत आयोजित स्टुडंट इंटर्न बडी (एसआयबी) सत्कार कार्यक्रमात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्याचे आवाहन केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Amazing Goa CM Pramod Sawant

पणजी: अमेझिंग गोवा जागतिक व्यावसायिक परिषदेत आयोजित स्टुडंट इंटर्न बडी (एसआयबी) सत्कार कार्यक्रमात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी नोकरी शोधण्याऐवजी रोजगार निर्माण करावा आणि गोव्याला एक आधुनिक आणि विकसित राज्य बनवण्यासाठी आपले अमूल्य योगदान द्यावे, असे यावेळी ते म्हणाले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, की नोकरी शोधण्यापेक्षा रोजगार निर्माण करण्यासाठी आज अनेक संधी युवकांना उपलब्ध आहेत. राज्याची सर्व धोरणे युवकांना आधार देण्यावर केंद्रीत आहेत. हरित ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इतर नवीन तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रांमध्ये उद्योगांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जोखीम पत्करून अपयशाच्या भीतीवर मात करावे, असेही त्यांनी सुचविले.

या कार्यक्रमात व्हायब्रंट गोवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजकुमार कामत, व्हायब्रंट गोवा फाउंडेशनचे अरमान बंक्ले, अमेझिंग गोवा परिषदेचे अध्यक्ष विनय वर्मा आणि व्हायब्रंट गोवा फाउंडेशनचे उपाध्यक्ष मनोज पाटील उपस्थिती होते.

विद्यार्थ्यांचा गौरव

स्टुडंट इंटर्न बडी कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या कामाबद्दल गौरवण्यात आले. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना उद्योगांशी जोडून त्यांना व्यावहारिक अनुभव देण्यासाठी आयोजित केला होता. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना उद्योजकता, नेतृत्व आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये विकसित करण्यास मदत होते. अमेझिंग गोवा जागतिक व्यावसायिक परिषदेतर्फे गोव्यातील उद्योग आणि व्यापार वाढवण्यासाठी असे कार्यक्रम आयोजित केले जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa River Marathon: 14 डिसेंबर रोजी रंगणार 'गोवा रिव्हर मॅरेथॉन'! साडेसात हजारांहून जास्त धावपटू होणार सहभागी

Ponda: रितेश नाईकांच्या गळ्यात माळ पडणार का? फोंड्याचा आमदार बिनविरोध निवडण्याची मागणी; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांचे मौन

Goa Politics: खरी कुजबुज; स्वतःला जेम्स बाँड समजणारा पोलिस अधिकारी

Panaji Spa Ban: पणजीत 'स्पा'ना बंदी! अखेर मनपाला आली जाग; नवीन परवानग्या दिल्या जाणार नाहीत

Siolim: वस्तू पळवायला घरात घुसल्या, स्थानिकांनी ठेवले झाडाला बांधून; शिवोलीत 2 परप्रांतीय महिलांना गावकऱ्यांनी घडवली अद्दल

SCROLL FOR NEXT