Sunburn Festival 2024: CM सावंत ठरवणार ‘सनबर्न’चे भवितव्‍य, सत्ताधारी बाकांवरील आमदारांनीच दर्शवला होता विरोध

CM Pramod Sawant: धारगळ येथील नियोजित ‘सनबर्न’प्रकरणी पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर व मांद्रेचे आमदार जीत‌ आरोलकर यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्‍यान, मुख्‍यमंत्र्यांनी आज एक महत्त्‍वपूर्ण बैठक बोलावली असून, तीत ‘सनबर्न’चे भवितव्‍य निश्‍चित होणार आहे.
CM Pramod Sawant
CM Pramod Sawant x
Published on
Updated on

Sunburn 2024 Dhargalim Dispute CM Pramod Sawant Calls Meeting

पणजी: धारगळ येथील नियोजित ‘सनबर्न’प्रकरणी पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर व मांद्रेचे आमदार जीत‌ आरोलकर यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सरकारमध्‍ये सामील असलेल्‍या या दोघांनीही सनबर्नला विरोध‌ केला आहे. दरम्‍यान, मुख्‍यमंत्र्यांनी आज (शुक्रवारी) एक महत्त्‍वपूर्ण बैठक बोलावली असून, तीत ‘सनबर्न’चे भवितव्‍य निश्‍चित होणार आहे.

धारगळच्या ग्रामसभेत यापूर्वी ‘सनबर्न नकोच’ असा ठराव संमत करण्‍यात आला आहे, तर पंचायत मंडळाने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पंचायत मंडळ श्रेष्ठ की ग्रामसभा श्रेष्ठ, असा प्रश्‍‍न निर्माण झाला आहे. या प्रश्‍‍नी पुन्हा विशेष ग्रामसभा बोलवावी अशी मागणी ग्रामस्थांनी पुन्‍हा एकदा लावून धरली आहे.

CM Pramod Sawant
Goa IFFI 2024: रिक्षेत धूम्रपान करताना हटकल्याने बॉलीवूड अभिनेत्रीने केली शिवीगाळ; इफ्फीबाहेर High Voltage Drama

सनबर्नला आता पर्यटन खात्याची परवानगी मिळणे बाकी आहे. पंचायतीच्या हंगामी परवानगीवर, ती दिली जाते की नाही याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. शिवाय पेडणे तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या ग्रामसभांतून ‘सनबर्न नकोच’ असा ठरव संमत झाला आहे. धारगळचे ग्रामस्थ प्रा. भारत बागकर यांनी सनबर्नविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सादर केलेल्‍या याचिकेवर काय निकाल लागतो, याकडेही लक्ष लागून राहिले आहे.

आमदार प्रवीण आर्लेकर यांच्यासमोर स्थानिकांच्या मागण्यांवर विचार करून सरकारशी चर्चा करण्याचे आव्हान आहे. जर ग्रामसभा झाली तर सनबर्नच्या आयोजनावर जनतेचा दबाव वाढू शकतो. फेस्टिव्हलसाठी परवानगी मिळाल्यास स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांच्या भूमिकेमुळे या विषयाला आणखी राजकीय वळण मिळण्याची शक्यता आहे. राजकीय दबाव आणि स्थानिकांच्या भावना यामुळे फेस्टिव्हलच्या भवितव्यावर निर्णय घेतला जाणार आहे.

पेडण्‍यातील सरपंच, पंच, नगरसेवकांशी करणार चर्चा

धारगळ येथे होऊ घातलेल्‍या सनर्बन संगीत महोत्‍सवावरून पेडणेत निर्माण झालेल्‍या परिस्‍थितीवर चर्चा करण्‍यासाठी मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उद्या बुधवारी ४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता एक महत्त्‍वपूर्ण बैठक बोलाविली आहे. पेडणे मतदारसंघातील सरपंच, पंच, नगराध्‍यक्ष, नगरसेवक व संबंधितांची या बैठकीला उपस्‍थिती असेल. साहजिकच सनबर्नचे भवितव्‍य ठरविणाऱ्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

आमदारांचा विरोध सरकार मोडणार?

आमदार आर्लेकर यांनी सनबर्नविरोधात दंड थोपटले आहेत. आपल्याला विश्‍‍वासात न घेता आपल्या मतदारसंघात सनबर्नचे आयोजन कसे केले जाते? असा प्रश्‍‍न त्‍यांनी उपस्‍थित केला आहे. प्रसंगी आत घुसून सनबर्न बंद पाडू असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यांच्या सुरात आता शेजारील मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांनीही सूर मिसळला आहे. आरोलकर हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे सनबर्न रद्द करण्यासाठी ते आपले वजन खर्ची घालणार का? असा प्रश्‍‍न निर्माण झाला आहे. दोन्ही सत्ताधारी आमदार विरोधात गेल्याने सरकार त्यांचे ऐकणार का? त्यांचा विरोध मोडून काढण्‍यासाठी सरकारी पातळीवर काही उपाययोजना केली जाणार का? विरोध असतानाही सनबर्न आयोजित करण्याचे धाडस दाखवले जाणार का? अशा अनेक प्रश्‍‍नांनी पेडणेवासीयांच्‍या मनात थैमान घातले आहे.

CM Pramod Sawant
Sunburn Festival 2024: ‘सनबर्न’ मान्‍यतेवरुन विशेष ग्रामसभेची जोरदार मागणी; प्रसंगी घुसून महोत्‍सव बंद करु, आमदार आर्लेकरांचा इशारा

पेडणेतील लोक तेथे बटाटेवडे विकणार का?

पेडणे या देवदेवतांच्या भूमीत सरकारने ‘सनबर्न’ लादण्याचा जो प्रयत्न केला आहे, तो हाणून पाडण्यासाठी तेथील जनता सज्ज बनली आहे. प्रवीण आर्लेकर व जीत आरोलकर या दोन्‍ही आमदारांनीही विरोध केला आहे. याबाबत आर्लेकर म्‍हणाले की, धारगळ येथे होणाऱ्या सनबर्न महोत्‍सवामुळे पेडण्यातील युवकांना रोजगार मिळणार, टॅक्सीवाल्‍यांना भाडी मिळणार, खाद्यपदार्थांचे गाडे चालणार अशी विविध आमिषे दाखविण्‍यात येत आहेत. अशा विनाशकारी महोत्‍सवाच्‍या ठिकाणी पेडणेतील लोक बटाटेवडे विकणार का? असा सवाल आर्लेकर यांनी उपस्‍थित केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com