CM Pramod Sawant Birthday Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant Birthday: मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस ठरणार आकर्षणाचा केंद्रबिंदू! असे असतील दिवसभरातील कार्यक्रम

24 एप्रिल रोजी येणारा वाढदिवस भाजपच्या राज्य युनिटद्वारे साजरा केला जाईल

दैनिक गोमन्तक

CM Pramod Sawant Birthday: येत्या 24 एप्रिलला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने अनेक सामाजिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा आगामी 50 वा वाढदिवस संस्मरणीय व्हावा यासाठी भारतीय जनता पक्ष राज्य युनिट कोणतीही कसर सोडणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

24 एप्रिल रोजी येणारा वाढदिवस भाजपच्या राज्य युनिटद्वारे साजरा केला जाईल, दिवसभर अनेक सामाजिक कार्यक्रमांचे नियोजन केले जाईल.

सावंत यांनी पदभार स्वीकारल्यापासून त्यांचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला गेला नाही आणि त्यामुळे यंदा सेवा, उत्तम प्रशासन आणि गरिबांच्या कल्याणावर आधारित कार्यक्रम आयोजित करून हा एक अविस्मरणीय कार्यक्रम करण्याचा पक्षाचा विचार आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे म्हणाले की, इतर कार्यक्रमांसह गरजू आणि वंचितांना फळ वाटप, भाजप महिला मोर्चाच्या वतीने आयोजित रांगोळी स्पर्धा आणि सर्वसामान्यांचा सहभाग असणारे इतर कार्यक्रम राज्यभर घेण्यात येणार आहेत.

वाढदिवसादिवशी मुख्यमंत्री शिरगाव येथील लईराई देवीची जत्रा आणि म्हापसा येथील मिलाग्रेस अशा दोन्ही भक्तीस्थळी आशीर्वाद घेणार आहेत. सकाळी 8.30 वाजता ते मंदिराला भेट देतील, त्यानंतर अस्नोडा येथील सातार्डेकर कुटुंबाला भेट देतील, जे राज्य सरकारच्या योजनेचे लाभार्थी आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त पर्वरी येथील विशेष मुलांच्या शाळेतील म्हणजेच संजय शाळेचे विशेष विद्यार्थी मुख्यमंत्र्यांना भेट देण्यासाठी 50 फुलांचा पुष्पगुच्छ तयार करण्याचे काम करत आहेत. या शाळेलाही मुख्यमंत्री भेट देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पक्षाचे सर्व मंत्री आणि आमदारही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT