Chodan Raibandar Ferry Dainik Gomantak
गोवा

चोडण-रायबंदर फेरी अचानक बंद केल्याने तणाव

दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा, पोलीसही गायब असल्याने वाहतूक कोंडी

दैनिक गोमन्तक

पणजी : चोडण-रायबंदर फेरीवर शुक्रवारी सकाळी मोठा गोंधळ पाहायला मिळाला. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या लोकांचे चांगलेच हाल झाले. चोडण आणि रायबंदर दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगाही पाहायला मिळाल्या. त्यातच रायबंदर फेरीच्या ठिकाणी नेहमी असणारे पोलीसही आज गायब असल्याने पुरता गोंधळ उडाल्याचं चित्र होतं.

चोडण ते रायबंदर मार्गावर शुक्रवारी सकाळी फेरीबोट नसल्याने मोठा गोंधळ उडाला. सुट्टीमुळे फेरींची संख्या कमी असल्याने दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलीसही (Police) गायब झाल्याने वाहन चालकांनी संताप व्यक्त केला. गर्दीच्या वेळी अशाप्रकारे वाट पाहायला लागल्याने कामावर जाणाऱ्या लोकांनाही नाहक मनस्ताप सहन करावा लागला. दुचाकीचालकांनी बाहेर पडण्याच्या मार्गावरही गाड्या लावल्याने फेरीमधून गाड्या बाहेर पडण्यास उशीर होत असल्याचं चित्र होतं. साहजिकच याचा परिणाम एकंदर फेरीबोट वाहतुकीवर झाला.

दुचाकींची संख्या जास्त असल्याने कारना फेरीबोटमध्ये प्रवेशच मिळत नव्हता. त्यामुळे तासभर वाट पाहूनही फेरीसाठी ताटकळत राहण्याची वेळ वाहनचालकांवर आली. चोडणमध्ये वाहनांच्या रांगा (Traffic) लागल्या होत्याच मात्र रायबंदर फेरीजवळील अरुंद आणि एकेरी मार्गावर गाड्यांच्या रांगा लागल्याने वाहतुकीची कोंडीही पाहायला मिळाली. पोलिस काहीकाळ येऊन फक्त पाहून गेले मात्र त्यांनी ही कोंडी सोडवण्यासाठी कोणतेही प्रयत्न न केल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे. या फेरीचा वापर मुख्यत्वे डिचोलीतून (Bicholim) पणजीत येणारे लोक करतात. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांना ऐन सणादिवशी कोंडीचा सामना करावा लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

Goa Water Metro Project: पर्यावरणपूरक बोटी अन् सुरक्षित जलप्रवास! CM सावंत यांच्या 'गोवा वॉटर मेट्रो' प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी

SCROLL FOR NEXT