Goa Shacks News Dainik Gomantak
गोवा

Goa Shack: विनापरवाना 161 शॅक्स बंद करा; हायकोर्टाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

GSPCB, जिल्हाधिकाऱ्यांना 5 एप्रिलपर्यंत अहवाल देण्याची सूचना

Akshay Nirmale

High Court on Illegal Shack in Goa: कांदोळी-कळंगुट किनारपट्टी क्षेत्रात विनापरवाना उभारलेल्या 161 शॅक्स बंद करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मंगळवारी दिले. खंडपीठाने उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश दिले आहेत.

खंडपीठाने म्हटले आहे की, गोवा राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाने (GSPCB) कळंगुट-कांदोळी परिसरात एकूण 161 शॅक विनापरवाना सुरू असल्याचे म्हटले होते. या शॅक्सनी राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाची कोणतीही परवानगी घेतलेली नाही.

त्यामुळे त्यांच्यावर कारवाईबाबत GSPCB क्लोजर ऑर्डर जारी केली होती. त्याच्या अंमलबजावणीची खात्री करावी, असे खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे.

या शॅक बंद करण्यासाठी जिल्हाधिकारी स्थानिक पोलिसांचे सहकार्य घेऊ शकतात. गोवा राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत 5 एप्रिलपर्यंत अहवाल द्यावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

संमतीविना सुरू असलेल्या या शॅक्सविरुद्ध कायद्यानुसार कोणती कारवाई करणे शक्य आहे, यासंदर्भातील माहिती द्यावी, असे निर्देश सोमवारीच गोवा खंडपीठाने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यटन खात्याला दिले होते.

राज्यातील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटन खात्याने शॅक्स उभारण्यास परवानगी दिली आहे. यानुसार प्रत्येक शॅक्स चालकाने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घ्यायला हवी. मात्र, कांदोळी-हणजूण परिसरात काही शॅक्स चालकांकडे ही संमती नसल्याचा दावा एका जनहित याचिकेत करण्यात आला होता.

यावर खंडपीठाने प्रदूषण नियंत्रण मंडळाला यासंदर्भात तपासणी करून अहवाल मागितला होता. या तपासणीत बहुतेकांकडे परवानगी नसल्याचे समोर आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

हातात AK47 घेऊन फोटो! सक्तीने 'धर्मांतरण' करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; गोव्यातील महिलेसह 10 जणांना अटक

Virat Kohli 5 Morning Habits: तुम्हीही व्हा विराटसारखे 'सुपरफिट'! कोहलीच्या फिटनेसचे रहस्य उघड, त्याची सकाळची 'ही' खास सवय माहितीय का?

सांगेत 14 वर्षांपासून जीवघेण्या लाकडी पुलावर धोकादायक प्रवास; आदिवासी बांधवांची व्यथा दुर्लक्षित!

IND vs ENG: रेकॉर्डब्रेकर गिल! मँचेस्टरमध्ये शुभमन करणार मोठा धमाका; 19 वर्ष जुना रेकॉर्ड निशाण्यावर

Ishan Kishan Dance Video: 'सॉरी सॉरी' गाण्यावर इशान किशनचा भन्नाट डान्स; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, 'वाह क्या बात है...'

SCROLL FOR NEXT