Cleanliness Awareness Activities Gomantak Digital Team
गोवा

Arambol News : हरमल पंचायत क्षेत्रात स्वच्छता, जागृती उपक्रम

पर्यटनस्थळ प्रसिद्ध असल्याने पंचायतीच्या निर्णयास पाठिंबा द्या व आवश्यक सूचना करून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन सरपंच फर्नांडिस यांनी केले.

गोमन्तक डिजिटल टीम

हरमल : गोवा घटकराज्य दिनाच्या निमित्ताने हरमल पंचायत व पंचायत संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने मार्केट परिसरात स्वच्छता व जागृतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. सरपंच बर्नार्ड फर्नांडिस यांनी घटकराज्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच संयोजिका साक्षी टिकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मासळी मार्केट भागात स्वच्छता केली व मासे विक्रेत्या महिलांना स्वच्छतेच्या बाबतीत सजगता बाळगण्याची विनंती केली.

गाव स्वच्छ राखण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य केले पाहिजे. पर्यटनस्थळ प्रसिद्ध असल्याने पंचायतीच्या निर्णयास पाठिंबा द्या व आवश्यक सूचना करून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन सरपंच फर्नांडिस यांनी केले.

यावेळी गटविकास खात्याचे भिवा ठाकूर, अजित धारगळकर, हरमल पंचायत सचिव शेट्ये, संयोजिका साक्षी टिकर, जॉअना अल्वारिस, तन्वी प्रभुगावकर, पंचसदस्य सदस्य सांतान फर्नांडिस, सुशांत गावडे, भिकाजी नाईक तसेच पंचायत कर्मचारी प्रमोद गावडे, गोपाळ खवणेकर, मिनिनो माशादो, कचरा व्यवस्थापन समितीचे सचिव चंद्रहास दाभोलकर उपस्थित होते.

यावेळी पंचायतीने विविध आस्थापनांची पाहणी केली व प्लास्टिक कचरा अस्ताव्यस्त केल्याच्या कारणास्तव दंडात्मक कारवाई केली. पुढील काही दिवस प्लास्टिक निर्मूलन फेरी व दंडात्मक कारवाई मोहीम चालू असेल, असे सरपंच बर्नार्ड फर्नांडिस व सचिव शेट्ये यांनी सांगितले.

कचऱ्याचे विपरित परिणाम जनजीवनावर होत असून कॅन्सरसारखे भयानक रोग पसरत असल्याने सावधानता म्हणून प्लास्टिक जाळू नये. प्लास्टिक निर्मूलन होणे काळाची गरज असून प्रत्येकाने वापर केल्यानंतर ते फेकून न देता, कचरा गोळा करणाऱ्या व्यक्तीकडे ते द्यावे.

- साक्षी टिकर, पंचायत संचालनालयाच्या संयोजिका

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT