Arambol News: हरमलमध्ये रात्री-अपरात्री बत्ती गुल!

नागरिकांत संताप : कमी दाबाचा पुरवठा; वीज खात्याचा अनागोंदी कारभार
Power outage
Power outageDainik Gomantak
Published on
Updated on

Power outage हरमल येथील पंचायत क्षेत्रात पावसाळ्यात वीज गायब होणे उचित असते. मात्र, पावसाळा नसूनही शुक्रवार, 12 रोजी रात्री दोनवेळा वीज गायब झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तर शनिवार, 13 रोजी दुपारी 12 वा.च्या सुमारास कमी दाबाचा पुरवठा झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

वीज दरवाढ करून सरकार धनाढ्य लोकांना फायदा करून देते तर सामान्य लोकांना भुर्दंड पडतो. उकाड्यात वीज खंडित करून तो पुरवठा दुसरीकडे तर केला जात नाही ना, अशी शंका असून, अशा लोकांना घरी बसवावे लागेल, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

Power outage
'भाजपने गोवा, महाराष्ट्र, कर्नाटकातील सरकार पाडलं, पण...' NCP आमदाराचे ते ट्विट चर्चेत

शुक्रवार, 12 रोजी रात्री 12 व 2 वा.च्या सुमारास वीज गायब झाल्याने नागरिकांनी वीज खात्याच्या कारभाराला कंटाळल्याचे सांगितले. वारा, पाऊस नसूनही वीज गायब झाल्याने उकाड्याने त्रस्त जनतेने वीज खात्याच्या अनागोंदी कारभाराबाबत असंतोष व्यक्त केला.

साधारणपणे गेल्या महिन्यात तीनवेळा शटडाऊन घेतले. मात्र, अद्यापही दुरुस्ती होत नाही. आणखीन शट डाऊन घ्यावे. मात्र, रात्रीच्या वेळी अंधार करू नये, असे मत नागरिक अँथनी डिमेलो यांनी व्यक्त केले.

मांद्रे सबस्टेशनचे काम आमदार जीत आरोलकर यांच्या कडक भूमिकेमुळे पूर्णत्वाकडे आले. तरीही वीजपुरवठा असा खंडित होण्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

Power outage
Mapusa Government Complex: म्हापसा सरकारी संकुलात वाहन पार्किंगसाठी उपजिल्हाधिकाऱ्यांचा दिला 'हा' आदेश

उकाड्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवा

पावसाळ्यापूर्वी वीज खाते सक्रिय असल्याचे दाखवते. प्रत्यक्षात रात्रीच्या वेळेत वीज गायब होत असल्याने संताप अनावर होतो.

उकाडा किंवा डासांच्या प्रादुर्भावामुळे योग्य झोप घेणे कठीण असते, त्यामुळे मे महिन्यात वीज सुरळीत व विनाखंडित ठेवण्याची मागणी नागरिक अशोक पेडणेकर यांनी केली.

शट डाऊनला अर्थ काय?

दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात तातडीची वीज दुरुस्तीची कामे करण्याच्या नावाखाली वीज खाते कार्यमग्न असल्याचे चित्र निर्माण करते. प्रत्यक्षात नेमके काय केले जाते, हा प्रश्‍नच आहे.

शट डाऊन केल्यानंतर वीज ग्राहक संयमाने समजून घेत असतो. परंतु उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला रात्री-अपरात्री वीजपुरवठा खंडित करून त्रास देऊ नका, असे डिमेलो यांनी सांगितले.

आता इन्व्हर्टर घ्यायला हवेत

राजकारणी मंडळी निवडणूक काळात पैशाची बंडले घेऊन दारोदारी जाऊन मतांची भीक मागतात. ते पैसे न घेता त्यांच्याकडे इन्व्हर्टरची मागणी केल्याशिवाय गत्यंतर नसल्याचे नागरिक पेडणेकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com