Exam  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात एप्रिलमध्ये होणार दहावी आणि बारावीची दुसरी सत्र परीक्षा

राज्यात कोरोना निर्बंधामुळे बंद असलेले शैक्षणिक वर्ग येत्या सोमवारपासून सुरू होणार आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: दहावी आणि बारावीची दुसरी सत्र परीक्षा एप्रिल महिन्यात होणार असून त्याचे वेळापत्रक गोवा शालान्त माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने जारी केले आहे. वेळापत्रकानुसार, सत्र परीक्षेला 5 एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. दहावीची परीक्षा 26 एप्रिलपर्यंत तर बारावीची परीक्षा 22 एप्रिलपर्यंत सुरू राहील. तांत्रिक विषयांचे पेपर शेवटी होणार आहेत. (Goa Exam Updates)

बारावीच्या व्यवसाय शाखेची परीक्षा 6 एप्रिल पासून सुरू होईल, तर तर अन्य शाखांचे पेपर 5 एप्रिल पासून सुरू होतील. कोविडमुळे (COVID-19) दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल सत्र परीक्षांच्या गुणांवर आधारित असेल. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये झालेल्या पहिल्या सत्र परीक्षेचे (Exam) गुण जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या सत्र परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

राज्यात कोरोना निर्बंधामुळे बंद असलेले शैक्षणिक वर्ग येत्या सोमवारपासून सुरू होणार आहेत. संबंधीत निर्णय आज जाहिर करण्यात आला असुन, उद्यापर्यंत परिपत्रक जारी होणार आहे. 1 ली ते 12 वी पर्यंतचे प्रत्यक्ष शैक्षणिक वर्ग सुरु करण्यात येणार आहेत, राज्यातील कोविड स्थिती नियंत्रणात आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्र सरकारने राज्यावर निर्णय सोपवला

राज्यांनी आपापल्या राज्यातील कोविड स्थितीची अवलोकन करून यासंबंधीच्या निर्बंधांचे निर्णय घ्यावेत अशी सूचना केंद्रीय आरोग्य खात्याचे सचिव राजेश भूषण यांनी केली होती. आरोग्य खात्याच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे, की सध्या देशभरात कोरोनाची स्थिती सुधारत आणि कमी होताना दिसत आहे. त्यामुळे यासंबंधीची नियम आणि अटींचे निर्णय राज्य सरकारने (State Government) घ्यावेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मंदार सुर्लकर यांच्या मारेकऱ्यांना माफी मिळणार? दोषींच्या वकिलांनी लावला जोर; गोवा खंडपीठाच्या सोमवारच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

पोर्तुगीजकालीन कागदपत्रे आता एका क्लिकवर! 'गोवा ऑनलाईन' पोर्टलवर सुरु होणार सर्वात मोठी डिजिटल सेवा; नागरिकांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचणार

खरी कुजबुज: युती तुटणार? की वाद मिटणार?

Maina Curtorim Mega Project Protest: सरपंच, सचिवावर कारवाई करा! मायणा-कुडतरी मेगा गृहप्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Goa Mega Project Protest: गावाचे गावपण नष्ट करु नका! दवंडे प्रकल्पाविरोधात स्थानिकांचा मडगाव पालिकेवर मोर्चा; 15 दिवसांत प्रकल्प रद्द करण्याचे निवेदन

SCROLL FOR NEXT