Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Cash For Job Scam: 'प्रत्येकाला वाटतंय मीच CM, गोवा सरकारमध्ये सुरुय सर्कस, सगळे जोकर खेळतायेत'; LOP युरींची टीका

Goa Cash For Job Scam: चौकशीसाठी सोमवारपर्यंत न्यायालयीन आयोग न नेमल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशारा प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिलाय.

Pramod Yadav

Goa Cash For Job Scam

पणजी: राज्यात सध्या गाजत असलेल्या नोकरभरती घोटाळ्याच्या चौकशीसाठी न्यायालयीन चौकशीची मागणी सर्व विरोधी घटक करत आहेत. तरीही राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. या चौकशीसाठी सोमवारपर्यंत न्यायालयीन आयोग न नेमल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरले, असा इशारा प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी आज गुरुवारी दिला.

काँग्रेस भवनात सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत पाटकर बोलत होते. याप्रसंगी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन व इतरांची उपस्थिती होती. पाटकर म्हणाले, या नोकरभरती घोटाळ्यात उच्चभ्रू राजकारण्यांचा सहभाग आहे.

नोकरीचे आमिष दाखवून फसविले गेलेल्यांना सरकारने कायदेशीर संरक्षण द्यावे, अशी विनंती आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे. सरकारने अशी तरतूद केली तर अधिकाधिक पीडित तक्रारी दाखल करतील.

हे सरकार निःपक्षपाती चौकशी करु शकत नाही : युरी आलेमाव

युरी आलेमाव म्हणाले की, या घोटाळा प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण कारण पोलिस राजकीय किंवा इतर दबावाखाली येऊ शकतात. या प्रकरणात अडकलेल्यांचा भाजपशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कारवाई करण्यात प्रशासन अपयशी ठरू शकते.

निःपक्षपाती तपासामुळे एजंटांची टोळी उघडकीस येण्यास मदत होईल. भाजप सरकारवर जनता विश्वास ठेवू शकत नाही. राज्य सरकारची मोठी सर्कस सुरू आहे आणि सगळे जोकर खेळत आहेत. प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजत असल्याची टीकाही त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'काँग्रेस थर्ड क्लास, चारित्र्यहीन पार्टी'; वडिलांचे खोटे पोस्टर व्हायरल केल्याचा आरोप करत मनोज परब यांचा हल्लाबोल

Honnali Nawab: मुंबईहून इंग्रजी सैन्य कुर्गच्या वाटेने श्रीरंगपट्टणकडे निघाले, शौर्यगाथा होन्नालीच्या नवाबाची

साखळीत मुख्यमंत्री विठुरायाच्या चरणी लीन, केला पांडुरंगाला अभिषेक; Watch Video

Konkan Migration: आफ्रिकेतून आलेले, होमो प्रजातींमधून विकसित झालेले काही मानव किनाऱ्यावर स्थायिक झाले; कोकणातली स्थलांतरे

Hybrid Car: कार घेण्याचा विचार करताय? 1200 किमी मायलेज असलेल्या 'या' 3 Hybrid Cars वर मिळतेय जबरदस्त सूट

SCROLL FOR NEXT