Ramdev baba Dainik Gomantak
गोवा

Miramar Beach : शिक्षक, विद्यार्थ्यांनो रामदेव बाबांच्या 'योगा'ला हजेरी लावा! शिक्षण खात्याचा आदेश

18 ते 20 फेब्रुवारी या काळात शिबीराचे आयोजन

Rajat Sawant

Miramar Beach : गोवा सरकार व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात योगगुरु रामदेव बाबा यांचे तीन दिवसीय योग शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरासाठी विद्यार्थी व शिक्षकांना उपस्थित राहण्याचे आदेश शिक्षण खात्याकडून देण्यात आले आहेत. राज्यातील विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी विशेष शिबिर घेण्यात येणार आहे.

राज्यात योगगुरु रामदेव बाबा यांचे तीन दिवसीय योग शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर मिरामार समुद्रकिनाऱ्यावर 18 ते 20 फेब्रुवारी या काळात होणार आहे. योग शिबिर दररोज पहाटे 5 ते सकाळी 7.30 या वेळेत होणार आहे.

या शिबिरात रामदेव बाबा पहाटे 4.45 वाजता उपस्थित राहणार आहेत. 20 फेब्रुवारीला सायंकाळी 4 ते 6 या वेळेत राज्यातील सरकारी, अनुदानित व विनाअनुदानित अशा सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी यावेळी विशेष शिबिर घेण्यात येणार आहे.

सर्व शिक्षकांसह एनएसएस, एनसीसी, स्काऊट व गाईडच्या विद्यार्थ्यांना या शिबिरासाठी उपस्थित राहण्याचे तसेच यावेळी विद्यार्थी शिक्षकांनी वाहतुकीसाठी बालरथचा वापर करावा असे आदेश शिक्षण खात्याकडून देण्यात आले आहेत. याबाबतचे परिपत्रक खात्याकडून जारी करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT