Churchill Alemao  Dainik Gomantak
गोवा

Churchill Alemao : राजकारणातून निवृत्ती हवी, पण लोकांचा आग्रह सोडवेना

आपण घेतलेले निर्णय गोव्याला लाभदायक असल्याचा चर्चिल आलेमाव यांचा दावा

गोमन्तक डिजिटल टीम

Churchill Alemao : राजकारणातून निवृत्तीचा आपला विचार होता, पण लोक आपणाला ते करू देत नाहीत. उलट आपण लोकसभा निवडणूक लढवावी म्हणून ते आग्रह करू लागले आहेत, असे बाणावलीचे माजी आमदार चर्चिल आलेमाव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

1990 मधील कालखंडात अठरा दिवस मुख्यमंत्री राहिलेले चर्चिल पुढे म्हणाले, की त्या अल्पकाळात आपण जे काही निर्णय घेतले व प्रकल्प सुरू केले ते गोव्याला दीर्घकाळ लाभ देणारे ठरले आहेत. आपण सदैव लोकांबरोबर रहाणारा आहे व म्हणूनच लोकही आपणाबरोबर असतात.

खासदार म्हणून दोनदा दक्षिण गोव्यातून लोकसभेवर गेलेले 73 वर्षीय चर्चिल पुढे म्हणाले, आगामी दिवसात आपण कुठे असेन याची कल्पना लोकांना लवकरच येईल. नुकत्याच पार पडलेल्या पंचायत निवडणुकीच्या निकालाप्रती त्यांनी समाधान व्यक्त केले व म्हटले की, मतपत्रिका हीच विधानसभा मतदानासाठी उचित पध्दत आहे. बाणावलीत आपण पाठिंबा दिलेले बहुतेक उमेदवार निवडून आल्याचा दावा करतानाच या निवडणुकीत राजकीय पक्षांनी पाठिंबा दिलेल्यांना पडलेली मते पाहिली, तर विधानसभा निवडणुकीत आरजीला पडलेली मते यावेळी कुठे गेली असा प्रश्न उपस्थित होतो. त्यांनी आपवरही निशाणा साधला व त्या पक्षाच्या मोफत विजेच्या आश्वासनाचे काय झाले असा सवाल केला.

मतदान यंत्रांच्या वापराबाबत संशय

चर्चिल आलेमाव यांनी मतदान यंत्रांच्या वापराबाबत संशय घेताना त्याबाबत आपणाला अधिक भाष्य करायचे नाही, पण पंचायत निवडणुकीच्या निकालाने बरेच काही दाखवून दिल्याचे त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT