Ro Ro ferry ticket price Goa Dainik Gomantak
गोवा

Ro Ro ferryboat: 'रो-रो फेरीबोटी'वरुन तापले वातावरण! ग्रामसभा न घेतल्याने संतापाचा सूर; चोडणवासीयांचा गंभीर इशारा

Ro Ro ferry ticket price: चोडण-रायबंदर जलमार्गावरील रो-रो फेरीबोटीच्या समस्या आणि तिचा तिकिट दर कमी करण्यासाठी १५ सप्टेंबरपूर्वी खास ग्रामसभा घेण्याचा ठराव झाला होता.

Sameer Panditrao

तिसवाडी: चोडण-रायबंदर जलमार्गावरील रो-रो फेरीबोटीच्या समस्या आणि तिचा तिकिट दर कमी करण्यासाठी १५ सप्टेंबरपूर्वी खास ग्रामसभा घेण्याचा ठराव झाला होता. मात्र पंचायत मंडळाने त्याची पूर्तता न केल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे.

सरपंच रमाकांत प्रियोळकर यांनी सांगितले की, संबंधित मंत्री, आमदार व अधिकारी यांना आमंत्रण पाठवले होते; पण प्रतिसाद न आल्याने आज १४ सप्टेंबर रोजीची ग्रामसभा होऊ शकली नाही. पुढील पंचायत बैठकीत यावर निर्णय होईल.

सामाजिक कार्यकर्ते इझाबिओ डिसिल्वा यांनी पंचायतीला पत्र देऊन ठरावाची आठवण करून दिली. पंचायत चालढकल करत असल्यास त्याचे परिणाम मंडळाला भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.

काही नागरिकांनी पंचायत व सरकारच्या वेळकाढूपणावर टीका केली. यापूर्वीही मेगा प्रोजेक्ट व स्विमिंग पूल विषयावरील ग्रामसभा टाळतच गेली होती. त्यामुळे ग्रामसभा न झाल्यास यावेळी ग्रामस्थच सभा घेण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"99 प्रॉब्लेम्स आहेत, पण नवऱ्याची कटकट नाही", दक्षिणी अभिनेत्रीचे डिवोर्स फोटोशूट; नेटकरी थक्क

Curchorem: ...तर पालिकेसमोरच मासळी विक्री करू! कुडचडेतील पारंपरिक विक्रेत्‍यांचा इशारा; बेकायदेशीर विक्रीमुळे असंतोष

Abhishek Sharma Record: अभिषेक शर्माचा धमाका! 'किंग कोहली'ला टाकले मागे; नावावर केला मोठा विक्रम

Bhandari Samaj: भंडारी समाजाच्या नेत्‍यांकडून मोर्चेबांधणी सुरू! एकसंघ करण्‍याच्‍या दृष्‍टीने प्रयत्‍न सुरू; लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

Morjim: ...तोपर्यंत ‘त्‍या’ स्मशानभूमीचा वापर नको! न्यायालयाचे निर्देश; मोरजी पंचायतीला धक्का

SCROLL FOR NEXT