Ro Ro Ferryboat: ..रो रो फेरीबोट पुन्‍हा बंद पडली! भीतीने उडाली गाळण; प्रवासी 2 तास अडकले

Ro Ro Ferryboat Chorao Raibandar: रायबंदर–चोडण या जलमार्गावरून धावणारी रो रो फेरीबोट पुन्‍हा एकदा पाण्‍यात मध्‍येच बंद पडली. त्‍यामुळे प्रवाशांना दोन तासांपेक्षा अधिक काळ पाण्‍यातच रहावे लागले.
Ro Ro Ferryboat Goa
Ro Ro Ferryboat GoaDainik Gomantak
Published on
Updated on

प्रतिनिधी: रायबंदर–चोडण या जलमार्गावरून धावणारी रो रो फेरीबोट सोमवारी पुन्‍हा एकदा पाण्‍यात मध्‍येच बंद पडली. त्‍यामुळे प्रवाशांना दोन तासांपेक्षा अधिक काळ पाण्‍यातच रहावे लागले. बोटीच्‍या पंख्‍यात जाळे अडकल्‍यामुळे फेरीबोट पाण्‍यात थांबली.

सध्‍या पावसाचे दिवस असल्‍यामुळे असे प्रकार घडत असतात. पंख्‍यातील जाळे हटवून फेरीबोट पुन्‍हा सुरू करण्‍यात आल्‍याची माहिती नदी परिवहन मंत्री सुभाष फळदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. रायबंदर–चोडण मार्गावर गेल्‍या काही महिन्‍यांपासून ‘द्वारका’ ही रो-रो फेरीबोट सेवा सुरू करण्‍यात आली आहे.

या सेवेला स्‍थानिक आणि पर्यटकांकडूनही उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळत आहे. परंतु, सेवा सुरू झाल्‍यापासून ब्रेक निकामी झाल्‍याने फेरीबोट पाण्‍यातच अडकण्‍याच्‍या घटना घडल्‍या आहेत. सोमवारी ही फेरीबोट रायबंदरहून चोडणच्‍या दिशेने निघाली.

Ro Ro Ferryboat Goa
गर्दीला करा बाय! मुंबई ते कोकण प्रवास आता फक्त 3 तास, 'या' दिवशीपासून सुरू होणार Ro-Ro Ferry सेवा

पण, पाण्‍यात फेरीबोटीच्‍या पंख्‍यात जाळे अडकल्‍यामुळे ती मध्‍येच थांबली. त्‍यानंतर पंख्‍यात अडकलेले जाळे बाजूला हटवून फेरीबोट पुन्‍हा सुरू करण्‍यात आली. पण, या घटनेमुळे आतील प्रवाशांमध्‍ये काही वेळ भीतीचे वातावरण पसरले होते. शिवाय नागरिकांचे सुमारे दोन तासही वाया गेले.

Ro Ro Ferryboat Goa
RO RO Ferry: ..आता मुंबईतून सिंधुदुर्गात पोचणार झटक्यात! रो - रो सेवेची चाचणी; बोटीचे विजयदुर्ग बंदरात आगमन

प्रवाशांची भीतीने उडाली गाळण

रायबंदर–चोडण या जलमार्गावरून धावणारी रो रो फेरीबोट सोमवारी मांडवी नदीत मध्येच अचानक बंद पडल्याने या फेरीबोटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची भीतीने गाळण उडाली. दोन तास मांडवी नदीत फेरीबोटीत अडकलेल्या प्रवाशांनी अखेर फेरीबोट सुरू झाल्याने सुटकेचा निःश्वास सोडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com