Ferryboat Sinks At Chorao Dainik Gomantak
गोवा

Chorao Ferryboat: निष्काळजीपणामुळे बुडाली होती 'बेती फेरीबोट'! चोडण दुर्घटनेबाबत बंदर कप्तान खात्याचा अहवाल सादर

Ferryboat Sinks At Chorao: काही दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी चोडण फेरीधक्क्यावर बांधून ठेवण्यात आलेली बेती ही फेरीबोट बुडाल्याच्या घटनेचा चौकशी अहवाल बंदर कप्तान खात्याने सादर केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: काही दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी चोडण फेरीधक्क्यावर बांधून ठेवण्यात आलेली बेती ही फेरीबोट बुडाल्याच्या घटनेचा चौकशी अहवाल बंदर कप्तान खात्याने सादर केला आहे. या चौकशीत कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे.

भरती-ओहोटीच्या वेळेस फेरीबोट बांधण्यासाठी वापरलेल्या दोरखंडात आवश्यक तेवढा सैलपणा न दिल्याने बोटीवर ताण निर्माण झाला. भरती वाढल्यावर पाण्याचा स्तर उंचावला, परंतु दोरखंड न सैल केल्यामुळे बोटीचा तोल बिघडला आणि ती हळूहळू कलंडत पाण्यात बुडाली.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र फेरीबोटचे मोठे नुकसान झाले होते. बंदर कप्तान खात्याने चौकशीत संबंधित कर्मचाऱ्यांवर कर्तव्यपालन न केल्याचा ठपका ठेवला असून पुढील कारवाईसाठी शिफारस केली आहे. दुर्घटनेनंतर फेरीबोट उचलण्याचे काम दोन दिवस सुरू होते आणि ती आता पुन्हा वापरात आणण्यात आली आहे.

रायबंदर-सापेंद्र ते दिवाडी फेरीधक्क्याचा होणार विस्तार

रायबंदर-सांपेद्र ते दिवाडी या फेरीधक्क्याचे विस्तारकाम लवकरच हाती घेतले जाणार आहे. धक्क्याचा विस्तार हा रो-रो फेरी सेवेच्यादृष्टीने केला जात आहे. सध्या रायबंदर-चोडण या मार्गावर रो-रो सेवेला मिळालेल्या यशामुळे या मार्गावरही ही सेवा यशस्वी ठरणार आहे. त्यामुळे दिवाडी बेटावरील रहिवाशांसाठी दैनंदिन प्रवास सुलभ होईलच, शिवाय पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांही ही सेवा उपयोगी पडणार आहे.

फेरीधक्क्याच्या विस्तारीकरणाच्या कामाविषयी नदी परिवहनचे संचालक विक्रमसिंह राजेभोसले यांनी वरिष्ठ तांत्रिक सल्लागार (स्मार्ट सिटी कन्सल्टंट) सिल्व्हानो सिक्वेरा, उपव्यवस्थापक आणि अभियंता (स्मार्ट सिटी) यांनी पाहणी केली. धक्क्याच्या विस्तारासाठी तांत्रिक बाबी आणि डिझाइन आवश्यकतांवर चर्चा करण्यात आली. धक्क्याच्या दोन्ही बाजूला वाहन पार्किंग जागा निर्माण करण्यावरही चर्चा झाली. त्यामुळे वाहनांची योग्यपद्धतीने हालचाल होईल.

नव्या रो-रो फेरीमध्ये ८-९ कार आणि १५-२० दुचाकी वाहने राहू शकतील, ज्यामुळे रहिवाशांना दिवाडी आणि रायबंदर दरम्यान त्यांची वाहने जलद आणि अधिक सोयीस्कर पद्धतीने नेता येतील. नवीन फेरी मे २०२६ पर्यंत सेवेत रुजू होतील, अशी माहिती राजेभोसले यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shravan Month: क्षणात सर, क्षणात सोनेरी ऊन अन् चहूकडे हिरवाईचा साज! निसर्गसौंदर्य आणि सणांची पवित्र अनुभूती देणारा श्रावण पुन्हा अवतरला

Budh Mangal Yog: स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला बुध-मंगळाचा ‘दशांक योग’! 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस; अफाट धनलाभासोबत सुरु होणार सुवर्णकाळ

Cyber Crime: APK File डाउनलोड करणं पडलं महागात! आके येथील महिलेच्या बँक खात्यातून 6.5 लाख उकळले, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Crime News: आई आणि लहान भावाचा 17 वर्षीय अर्जुननं काढला काटा, चॅटजीपीटीला विचारायचा ठार मारण्याचा प्लॅन; अखेर 'सायको किलर' पोलिसांच्या ताब्यात VIDEO

Bison In Goa: नार्वेत गव्यांचा धुमाकूळ! भाजी पिकाची नासधूस, बंदोबस्‍ताची मागणी; ऐन पिकाच्या हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक फटका

SCROLL FOR NEXT