Ro-Ro Ferry In Goa Dainik Gomantak
गोवा

Ro-Ro Ferry In Goa: चोडण-रायबंदर रो-रो फेरीला 7 जुलैपासून होणार सुरुवात, दररोज जाणाऱ्या प्रवाशांना मिळणार 50% सवलत

Ro-Ro Ferry In Goa: चोडण-रायबंदर रो-रो फेरीला 7 जुलैपासून होणार सुरुवात, दररोज जाणाऱ्या प्रवाशांना मिळणार 50% सवलत.

Sameer Amunekar

तिसवाडी: चोडण-रायबंदर रो-रो फेरीबोटीचे दर सरकारने निश्चित केले असून प्रवासी व दुचाकींना मोफत प्रवास व चारचाकी वाहनांना रु. ३०/- व नेहमी जाणाऱ्या प्रवाशांना पासेस सिस्टिमद्वारे ५० टक्के सवलत दिली आहे.

या दोन्ही रो-रो फेरीबोटी या जलमार्गांवर सोमवार, ७ जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती नदी परिवहन खात्याचे संचालक विक्रमसिंग राजेभोसले यांनी चोडणच्या नागरिकांना दिली.

‘चोडणकारांचो आवाज’ या संघटनेच्या नेतृत्वाखाली चोडणचे एक शिष्टमंडळ श्रीकृष्ण हळदणकर यांच्या नेतृत्वाखाली संचालक राजेभोसले यांची बेती येथे भेट घेऊन या रो-रो फेरीबोटीविषयी माहिती जाणून घेतली.

यात भोसले यांनी समाधानकारक उत्तरे दिली. या शिष्टमंडळात चोडणचे माजी सरपंच तथा ‘चोडणकारांचो आवाज’ संघटनेचे अध्यक्ष श्रीकृष्ण हळदणकर, समाजकार्यकर्ते डिसिल्वा, मदन केरकर, सेल्सो डिसोझा, आरकांज फर्नांडिस, राजन केरकर, पेरेग्रीन फर्नांडिस, आर. डिसोझा व नॉरटन हेरेडिया यांचा सहभाग होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Caste Certificate: जातीचा दाखला मिळवण्याची प्रक्रिया झाली सुलभ! समाज पत्राची अट रद्द; गोवा सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

Dindi Mahotsav: टाळ-मृदुंगाचा ताल आणि विठुनामाचा गजर! खरपालात ‘दिंडी महोत्सव’ उत्साहात..

Colva: 'मी जीवन संपवत आहे'! गोव्यात येऊन भावाला केला फोन; दिल्लीहून बेपत्ता झालेला युवक सापडला कोलव्यात

Arvind Kejriwal Goa: 'जनतेचा भाजप, काँग्रेसवरील विश्वास उडाला आहे'! अरविंद केजरीवालनी केला दावा; ‘आप’च्या बैठकांसाठी गोव्यात दाखल

Goa Politics: खरी कुजबुज; युरीला जोर का धक्का

SCROLL FOR NEXT