Shigmotsav  Dainik Gomantak
गोवा

बांदोडा महालक्ष्मी समितीचा चित्ररथ प्रथम

अंत्रुज शिगमोत्सव: दुर्गाभाट साई बालमंडळ द्वितीय तर कपिलेश्‍वरी गजानन कला मंडळ तृतीय

दैनिक गोमन्तक

फोंडा: फोंडा तालुका अंत्रुज शिगमोत्सव समितीतर्फे आयोजित चित्ररथ स्पर्धेत बांदोडा येथील महालक्ष्मी नागरिक समितीला प्रथम क्रमांक मिळाला. साई बालमंडळ दुर्गाभाट-फोंडा यांना द्वितीय तर कपिलेश्‍वरी येथील श्री गजानन कलामंडळाला तृतीय क्रमांक मिळाला.

स्‍पर्धेतील उत्तेजनार्थ बक्षिसे अनुक्रमे ब्रह्मेश्‍वर युवक संघ आखाडा, श्री दामोदर महालक्ष्मी कला संघ बांदोडा, श्री दाडेश्‍वर स्पोर्टस्‌ कल्चरल क्लब नेरूल, श्री सिद्धेश्‍वर कला मंडळ बस्तोडा, श्री सरस्वती यूथ क्लब दाग-फोंडा यांना मिळाले. अन्‍य बक्षिसांमध्‍ये रायेश्‍वर युवक मंडळ राय, सातेरी युवक संघ मेरशी, महालक्ष्मी क्रिएशन सांगे, बालगोपाळ कला सांस्कृतिक मंडळ चिंबल, देवतेवाडा युवक मंडळ देवतेवाडा-कुडचडे, युनायटेड बॉईज्‌ फोंडा यांना प्राप्‍त झाली.

रोमटामेळात आडपई-आगापूर सुयोग मंडळाची बाजी

रोमटामेळ स्‍पर्धेत आडपई-आगापूर येथील सुयोग शिगमोत्सव मंडळाला प्रथम क्रमांक मिळाला. कुडचडे-काकोडा शिगमोत्सव समिती द्वितीय तर स्वरसाई शिगमोत्सव म्हापसा यांना तृतीय बक्षीस देण्यात आले. चौथे बक्षीस सावर्डे शिमगोत्सव समिती सावर्डे, पाचवे पाईकदेव शिगमोत्सव समिती सांगे यांना मिळाली. उत्तेजनार्थ बक्षिसे बार्देश शिगमोत्सव समिती, डोंगरी शिगमोत्सव मंडळ व श्री शांतादुर्गा शिगमोत्सव मंडळ कळंगुट यांनी पटकावली.

लोकनृत्‍यात कुर्टी सरस्वती कला मंडळ अव्‍वल

लोकनृत्य स्पर्धेत सरस्वती कला मंडळ केळबाय कुर्टी प्रथम, सावईवेरेचो सख्याहरी द्वितीय तर पिसगाळ येथील गुरुकला मंडळाला तृतीय क्रमांक मिळाला. उत्तेजनार्थ बक्षिसे श्री नवदुर्गा कला व सांस्कृतिक मंडळ मडकई, यशलीला कल्चरल असोसिएशन प्रियोळ, विघ्नेश्‍वर कलामंडळ काणकोण व शिवगर्जना ढोलताशा लेझिम पथक यांना देण्यात आली.

वेशभूषा स्‍पर्धेत प्रमोद, दित्या प्रथम

वेशभूषा स्पर्धेत मोठ्या गटात अनुक्रमे प्रमोद मोर्लेकर, योगराज गोवाणकर, संदेश नाईक, रामचंद्र गवाणकर, सिद्धेश मराठे, अनुष्का मोरजकर, अनुपचंद्र मडकईकर, मंथन गावस, तेजा नाईक व प्रभाकर चव्हाण तर छोट्या गटात दित्या शिरवईकर, अन्या सहकारी, लक्ष नाईक, तनुश्री वाडीकर, रुद्रज नाईक, रुत्वी नाईक, प्रज्ञा कुडव, शर्वी नाईक व साक्षी पागी यांना बक्षिसे प्राप्‍त झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Under 23 Cricket: कर्नल नायडू करंडकात गोव्याचा पराभव; बडोद्याची 4 विकेट्सनी बाजी

National Shilp Guru Award: गोव्याच्या मातीकलेचा राष्ट्रीय गौरव! अमर शेट यांना 'राष्ट्रीय शिल्पगुरू पुरस्कार'

Yuzvendra Chahal: वर्ल्ड कप 2023 मधून पत्ता का कट झाला? युजवेंद्र चहलचा मोठा खुलासा; म्हणाला, 'रोहित शर्माने मला आधीच सांगितले होते...'

Unnatural Death Case: नागव्यात 17 वर्षीय मुलाची आत्महत्या; हणजूण पोलिसांकडून तपास सुरू

Tesla Roadster Flying Car: रस्त्यावर धावणारी कार आता हवेतही उडणार! हेलिकॉप्टरसारखी लँडिंग, थ्रस्टरच्या मदतीने भन्नाट स्टंट Watch Video

SCROLL FOR NEXT