Shripad Naik Dainik Gomantak
गोवा

Goa Student: मुलांना व्यावहारिक शिक्षण गरजेचे; श्रीपाद नाईक

Goa Student: वाळपईत डॉ. हेडगेवार शाळेचे स्नेहसंमेलन

दैनिक गोमन्तक

Goa Student: विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावेत, याच हेतूने हेडगेवार शाळा राज्यात काम करत आहे. जेणेकरून पुढील पिढी सुशिक्षित होऊन समाजाचा व देशाचा विकास होईल. पुस्तकी शिक्षणाबरोबरच मुलांच्या यशस्वी जीवनासाठी व्यावहारिक शिक्षण फार महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय राज्य पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.

वाळपई येथे कदंब बसस्थानक सभामंडपात वाळपईच्या डॉ. केशव बळीराम हेडगेवार शाळेच्या स्नेहसंमेलनात ते बोलत होते.

यावेळी विशेष आमंत्रित डॉ. हेडगेवार शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुभाष देसाई, वाळपई विभाग अध्यक्ष व व्यवस्थापक डॉ. अशोक आमशेकर, सचिव प्रकाश गाडगीळ, मुख्याध्यापिका निलांगी शिंदे, माध्यमिक विभाग पालक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत मराठे, प्राथमिक विभागाच्या अध्यक्ष प्रियदर्शनी देसाई उपस्थित होत्या.

श्रीपाद नाईक म्हणाले, की शाळेने जी प्रगती दाखविली ती कौतुकास्पद आहे. नवीन संकुल निर्माण करण्याचे धाडसी काम वाळपईत केले आहे. हेडगेवार शाळेचा हाच वेगळेपणा आहे.

सुभाष देसाई म्हणाले की, हिंदू समाजात ताकद आहे, ती जीवंत ठेवली पाहिजे. काँग्रेसने संपूर्ण देश निधर्मी करून टाकला. त्यातून अनेक संकट निर्माण झाली. देश, धर्म संवर्धनासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. म्हणूनच अयोध्येत श्रीराम मंदिर स्थापन झाले आहे.

देश बलशाली होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फार मोठे योगदान आहे. मात्र, आपलेच लोक हिंदू संस्कृतीला विरोध करतात, हे मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.

यावेळी मुलांनी स्वागत गीत सादर केले. शिक्षिका दीप्ती चिमुलकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. स्वागत, प्रास्ताविक डॉ. अशोक आमशेकर यांनी केले. यावेळी वार्षिक विविध उपक्रमांत अव्वल ठरलेल्या मुलांना बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमात शेवटी ‘श्रीमंत योगी’ हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील महानाट्य मुलांनी सादर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT