Kidnapping Dainik Gomantak
गोवा

Kidnapping Case: 'अभ्यासातून सुटका पाहिजे होती'! 13 वर्षीय मुलाने केला अपहरणाचा बनाव; गोव्यातील 3 खोटी प्रकरणे उघड

Goa Kidnapping Case: काही आठवड्यांपासून चर्चेत असलेली लहान मुलांच्या अपहरणाच्या प्रयत्नांची तिन्ही प्रकरणे ही खोटी असल्याचे उत्तर गोवा पोलीस अधीक्षकांनी राहुल गुप्ता स्पष्ट केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: काही आठवड्यांपासून चर्चेत असलेली लहान मुलांच्या अपहरणाच्या प्रयत्नांची तिन्ही प्रकरणे ही खोटी असल्याचे उत्तर गोवा पोलीस अधीक्षकांनी राहुल गुप्ता स्पष्ट केले आहे. पोलिसांच्या तपासानंतर ही प्रकरणे केवळ कल्पना विलासातून केलेला बनाव असल्याचे सांगत पोलिसांनी औपचारिक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

ऑक्टोबर ६ ते २६ या कालावधीत वाळपई, डिचोली आणि पणजी पोलीस स्थानकांत तिन्ही ठिकाणी मुलाच्या अपहरणाच्या वेगवेगळ्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. परंतु साक्षीदारांचे जबाब, मुलांचे निवेदन आणि पुरावे तपासल्यानंतर ही प्रकरणे खोटी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वाळपई पोलीस स्थानकात दोन अनोळखी व्यक्ती पांढऱ्या कारमधून १२ वर्षीय मुलाला पळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र पोलिसांच्या चौकशीत कोणताही पुरावा न मिळाल्याने, स्थानिक साक्षीदारांनीही असा प्रकार घडल्याचे नाकारले.

डिचोलीत १३ वर्षीय मुलाने दिलेल्या तक्रारीनंतर चौकशी केली असता, त्यानेच कबुली दिली की, ही गोष्ट त्याने अभ्यासाच्या दडपणापासून सुटका मिळवण्यासाठी घडविली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT