Chieftains Memorial Trust Dainik Gomantak
गोवा

Cuncolim: बंडाच्या इतिहासाचे विकृतीकरण थांबवा - चीफटेन्स मेमोरियल ट्रस्ट

पणजी येथील ते प्रदर्शन तातडीने थांबवावे

Sumit Tambekar

पणजी येथे केंद्र सरकारने घोषित केलेल्या आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाचा भाग म्हणून स्वातंत्र्य लढ्यासह इतर इतिहासाची माहिती देणारे प्रदर्शन भरवले आहे. या प्रदर्शनात कुंकळीच्या इतिहासाची माहिती देणारी ही काही फोटो या प्रदर्शनात नागरिकांच्या पाहणीसाठी खुले आहेत.

(Chieftains Memorial Trust strongly condemns the distorting of the history of Cuncolim)

या फोटोवर आक्षेप नोंदवत चीफटेन्स मेमोरियल ट्रस्टने कुंकळीच्या इतिहासाचे विकृतीकरण थांबवावे यासाठी आवाज उठवला आहे. चीफटेन्स मेमोरियल ट्रस्टने याबाबत कदंब परिवहन महामंडळ, व्यवस्थापकीय संचालकांना याबाबत पत्र लिहले असून हे प्रदर्शन तातडीने बंद करावे अशी मागणी या पत्राद्वारे केली आहे. तसेच कुंकळी ग्रामस्त या प्रकारावरून संतप्त झाले आहेत.

ट्रस्टने याबाबत म्हटले आहे की, कुंकळीच्या इतिहासाचे सहहेतू विकृतीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यासाठी इतिहासाचा दाखला देत कुंकळी बंडाचा उल्लेख प्रदर्शनात असे म्हटले आहे की "पुढारी, हिंदू ब्राह्मण जमीनदारांच्या फाशीनंतर कुंकळी आणि वेळ्ळी, असोळणे, आंबेली आणि वेरोडा या गावातील शेतातून आणि फळबागांमधून निर्माण होणाऱ्या उत्पादनावर कर भरण्यास तत्कालीन पोर्तुगीज सरकारला नकार दिला. परिणामी त्यांच्या जमिनी जप्त केल्या गेल्या आणि मार्क्विस ऑफ फ्रंटियरच्या कॉन्डाडोकडे सोपविण्यात आल्या.

क्षत्रिय देसाई सरदारांच्या हत्याकांडानंतर नोंद घ्यावी क्षत्रिय देसाई यांना असोल्ना किल्ल्यावर शांततेसाठी आमंत्रित केल्यानंतर वरील गावांतील समुदायाने पोर्तुगीजांना कर भरण्यास नकार दिला त्यामुळे कुंकोलिमच्या क्षत्रिय देसाई समाजाच्या जमिनी सरकारी जप्त करण्यात आले.

कुंकळी येथे जमिनी जप्त केल्यानंतर, गोवेकरांनी एक लढा दिला. यानंतर जप्त केलेल्या जमीन परत मिळवण्यासाठी दीर्घकालीन कायदेशीर लढा दिला. हा लढा केवळ गोव्यातील न्यायालयातच लढला गेला. आणि जप्त केलेल्या जमीनीनी परत बहाल केल्या गेल्या आहेत. त्यामूळे हे प्रदर्शन तातडीने थांबवावे असे ही या पत्रात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT