"भारतीय सैनिक हेच आपल्या राष्ट्राचे खरे हिरो"

"जनतेने सैनिकांना दिलेले प्रेम बघून भारावलो"
Rakhi for Indian Soldiers
Rakhi for Indian SoldiersDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: आज आपल्या राष्ट्रासाठी तहान भूक हरपून भारतीय सैनिक लढत आहेत. प्रत्येक भारतीय नागरिकास याचा गर्व आणि अभिमान असायला हवा. भारतीय सैनिक आहेत म्हणून आपण सर्व आहोत. आपल्या राष्ट्राचे खरे हिरो हे भारतीय सैनिकच आहेत. असे गौरव पूर्ण उद्गार वक्ते अ‍ॅड शिवाजी देसाई यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त चैतन्य ट्रस्ट गोवा आणि डॉ के. ब. हेडगेवार हायस्कूल यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून बोलताना केले.

(Adv. Shivaji Desai's lecture was held at Valpoi in the event 'A Rakhi for Indian Soldiers')

Rakhi for Indian Soldiers
CM Pramod Sawant : येत्या वर्षभरात स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकांचं नुतनीकरण

अ‍ॅड देसाई पुढे म्हणाले की, भारत ही पुण्य भूमी आहे. आपण सर्वजण आपल्या भारतात जन्माला आलो आहोत यासाठी स्वतःस भाग्यवान समजायला हवे. भा म्हणजे तेज. सूर्याचा प्रकाश ज्या देशात सर्व प्रथम उगवतो तो देश म्हणजे भारत. प्रत्येक भारतीय बलवान, सामर्थ्यवान झाला तर आपले भारत राष्ट्र सामर्थ्यवान बनेल.

Rakhi for Indian Soldiers
Goa Biodiversity गोवा सरकारने आखला कृती आराखडा

निवृत्त सैनिक सागर सावंत म्हणाले की, सैन्यात असताना सैनिकांना राखी कधी मिळत नसते. पण आज मात्र आपण जनतेने सैनिकांना दिलेले प्रेम बघून भारावलो आहे. सैनिक कधीच निवृत्त होत नसतो. उद्या जर राष्ट्रासाठी सीमेवर पुन्हा लढाईस जावे लागले तर आपली तयारी आहे. यावेळी डॉ. अशोक आमशेकर म्हणाले की हिमाचल प्रदेशचे महामहीम राज्य पाल राजेंद्र आर्लेकर यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम सुरू झाला आहे. आणि हा कार्यक्रम अनेक ठिकाणी गोव्यात होत आहे.

यावेळी सत्तरी तालुक्यातील विविध 20 शाळांच्या वतीने भारतीय सैनिकांना बांधण्यासाठी राख्या निवृत्त सैनिक सागर सावंत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी डॉ. हेडगेवार हायस्कूल, श्री हनुमान विद्यालय हायस्कूल वाळपईच्या मुलांनी देशभक्ती गीत सादर केले. तसेच डॉ. हेडगेवार शाळेच्या मुलानी निवृत्त सैनिक सागर सावंत व संतोष गावकर यांना ओक्षण करुन राख्या बांधल्या.

कार्यक्रमाचे स्वागत शिक्षिका दिप्ती चिमुलकर हिने केले तर पाहु़ण्याची ओळख अनिशा गावस, सुत्रसंचालन सोनल नावेलकर तर आभार प्रांजल च्यारी हीने केले. शेवटी राष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी मोठ्या संख्येनी देश प्रेमींची उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर निवृत्त भारतीय सैनिक सागर सावंत, डॉ. हेडगेवार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डाॅ.अशोक आमशेकर, प्रकाश गाडगीळ, वैभव बापट आदी मान्यवर उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com