Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

मुख्यमंत्र्यांचा साखळी मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का

काँग्रेसचे उमेदवार धर्मेश सगलानी यांच्या निकटवर्तीयाचा भाजपच्या प्रमोद सावंतांना पाठिंबा

दैनिक गोमन्तक

साखळी: फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष आपले तगडे उमेदवार घोषित करत आहेत. त्यामुळे गोव्यातील अनेक मतदार संघात चुरशीची लढाई होणार असे चित्र समोर येत आहे. यातच साखळी मतदार संघात बदलत असलेल्या राजकीय समीकरणाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. (Pramod Sawant Goa Election Latest News)

साखळीमध्ये मुख्यमंत्री सावंत विरुद्ध कॉंग्रेस नेते धर्मेश सगलानी अशी लढत होणार आहे. मात्र, कॉंग्रेस (Congress) उमेदवार धर्मेश सगलानी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे साखळीचे माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेस नेते रियाज खान यांनी थेट मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांना पाठिंबा दिला आहे.

यामुळे कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. भाजपच्या (BJP) उमेदवाराला कॉंग्रेस नेत्याने पाठिंबा दिल्याने साखळीतील लढत ही सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे. कॉंग्रेस उमेदवार धर्मेश सगलानी हे निवडणुकीत बाजी मारण्यासाठी काय खेळी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेस नेते रियाज खान यांचा पाठिंबा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासाठी किती फायदेशीर ठरतो हे देखील बघावे लागेल.

काँग्रेसने तिसऱ्या उमेदवारी यादीत सगलानी यांचे नाव जाहीर केले होते. सगलानी यांनी 2017 मध्येही मुख्यमंत्र्यांना कडवी लढत दिली होती. यावर्षी साखळी मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colombia Earthquake: जमीन फाटली अन् इमारती कोसळल्या, डोळ्यांदेखत उडाली दाणादाण! कोलंबियातील भीषण भूकंपात 132 मृत्यू, 1500 हून अधिक घरे उद्ध्वस्त VIDEO

New Head Coach: वर्ल्ड कपच्या तोंडावर मोठा निर्णय; मुख्य प्रशिक्षक बदलला, आता 'या' व्यक्तीवर मोठी जबाबदारी

Rohit Sharma TV Show: क्रिकेटनंतर मनोरंजन विश्वात 'हिटमॅन'ची नवी इनिंग; रोहित शर्माचा स्वतःचा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Shukra Gochar 2026: कौटुंबिक सुख, रोमान्स अन् अफाट पैसा...! शुक्र करणार नक्षत्र परिवर्तन; 5 राशींना होणार तगडा धनलाभ

Savanar Maye tree fall: सावनार-मये येथे घरावर कोसळली झाडे, दोन लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान; मोठा अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT