मडगावात रंगणार बाबू विरुद्ध ‘बाबा’ सामना

कामत यांच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक आमचा बाबाच जिंकणार असा दावा केला आहे.
Babu Ajgaonkar and Digambar Kamat
Babu Ajgaonkar and Digambar Kamat Dainik Gomantak

मडगाव: मडगाव भाजपातील दुहीचा फायदा उठवत दिगंबर कामत यांनी प्रत्येकवेळी मडगावात बाजी मारली असली, तरी यंदा त्यांना प्रथमच बाबू आजगावकर या इतरांच्या तुलनेने तगड्या असलेल्या उमेदवाराला तोंड द्यावे लागणार आहे. पेडणेचा बाबू यावेळी मडगावच्या बाबासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

Babu Ajgaonkar and Digambar Kamat
गोव्यात शुक्रवारी 3 निवडणूक अर्ज दाखल

आतापर्यंत मडगावात (Margao) प्रमुख उमेदवार फक्त सारस्वत समाजाचे असायचे, मात्र भाजपने यंदा प्रथमच अनुसूचित जातीचे सदस्य असलेल्या बाबू आजगावकर यांना रिंगणात उतरवून या परंपरेला छेद दिला आहे. हा बदल भाजपच्या फायद्याचा ठरेल की तोट्याचा यावर या निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे.

बिगर सारस्वत उमेदवार या मुद्द्यावर बोलताना भाजपचे (BJP) उमेदवार बाबू आजगावकर यांनी मडगाव हे सुशिक्षित आणि प्रागतिक विचारांच्या लोकांचे शहर असून या शहराने कधीच जातिवादाला थारा दिलेला नाही. त्यामुळे बिगर सारस्वत उमेदवार हा मुद्दा आपल्याला फारसा अडचणीचा ठरणार नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. उलट मडगावच्या मतदारांना प्रथमच बहुजन समाजाचा उमेदवार मिळाला आहे असे ते म्हणाले.

Babu Ajgaonkar and Digambar Kamat
मुरगाव महिला काॅंग्रेसचे मिलिंद नाईक यांना 'हे' खुले आव्हान

प्रथमच सर्व भाजप कार्यकर्ते एकजुटीने काम करणार असून त्याचा फायदा आपल्याला होईल, असे ते म्हणाले. मी जरी तीनवेळा पेडणेतून निवडून आलो तरी मडगाव ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी हे कोणी विसरू नये. मी तालागाळातून वर आलेला कार्यकर्ता आहे, असे आजगावकर म्हणाले. कामत यांच्या कार्यकर्त्यांनीही ही निवडणूक आमचा बाबाच जिंकणार असा दावा केला. भाजपने कुणालाही उभे केले तरी विजय हा आमचाच होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्वतः दिगंबर कामत यांनी यावेळी 15 हजार मते मिळविणे हे आपले टार्गेट ठेवले आहे.

लढत एकतर्फी होणार?

बाबू आणि बाबा यांच्यातील यंदाची ही लढत नेहमीप्रमाणे एकतर्फी होणार नाही, असे संकेत मिळत आहेत. यावेळी तृणमुल काँग्रेसचा (TMC) उमेदवार बाबू जिंकून येणार की बाबा हे ठरविणार आहे. हा उमेदवार कोणीची मते काढणार, त्यावर या मतदारसंघाचा निकाल अवलंबून राहणार आहे. तृणमुल मडगावात घनश्याम शिरोडकर यांना उमेदवारी देणार की महेश आमोणकर यांना हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

- सुशांत कुंकळयेकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com