CM Promod sawant
CM Promod sawant Gomantak Digital Team
गोवा

CM Pramod Sawant : तीस हजार कोटींचा विकास

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यात स्वातंत्र्यानंतर 50 वर्षांत जेवढा विकास झाला नाही, त्या तुलनेत गेल्या 9 वर्षांत 30 हजार कोटी रुपयांचा विकास झाला. मोपा विमानतळ, झुआरी पूल, अटल सेतू, काणकोण येथील बगल रस्ता, आयुष हॉस्पिटल, पर्यटन क्षेत्रातील साधनसुविधांत वाढ व गावागावांनी केलेला विकास यांचा यात समावेश आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी सांगितले.

रावणफोंड येथील सहापदरी उड्डाण पूल, रावणफोंड ते खारेबांदपर्यंतच्या रस्त्याचे सौंदर्यीकरण यांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार दिगंबर कामत, आमदार उल्हास तुयेकर, माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर, माजी आमदार दामू नाईक, कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे सीएमडी संजय गुप्ता, जीएसआयडीसीचे एमडी हरिष अडकोणकर, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मडगावचा विकास करण्यासाठी दिगंबर कामत भाजपमध्ये आले आहेत. मडगाव कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे राहू नये हा कामत यांचा ध्यास आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.मडगावातील दोन्ही प्रकल्प 84.22 कोटी रुपये खर्चून पूर्ण केले जातील. तसेच हे दोन्ही प्रकल्प मुदतीपूर्वी पूर्ण केले जातील, असे हरिष अडकोणकर यांनी सांगितले. गेल्या 25 वर्षांत कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने गोव्याच्या विकासासाठी सहकार्य केले आहे. कोकण रेल्वेमुळे गोव्यात पर्यटकांची संख्या वाढली असे संजय गुप्ता यांनी सांगितले. सूत्रसंचालन नवनाथ शिरोडकर यांनी केले. बिंदिया वस्त नाईक यांनी ईशस्तवन म्हटले.

कुणाच्याही टीकेला घाबरत नाही : दिगंबर कामत

मडगाव हे आदर्श शहर बनवण्याचा प्रयत्न असल्याचे आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले. भारताने गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भरपूर विकास केला आहे. भारत विश्र्वगुरू होण्याच्या दृष्टीने पंतप्रधान मोदी योग्य पावले उचलत आहेत. मात्र, जोपर्यंत मडगावकरांचा आशीर्वाद व पाठिंबा मिळतोय, तोपर्यंत मी कुणाच्याही टीकेला घाबरत नाही, असे कामत म्हणाले.

चार वर्षांत प्रकल्प पूर्णत्वास

मडगाव शहराला ‘अच्छे दिन’ आले आहेत, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, शहरात सुसज्ज बस स्थानकाचे काम लवकरच सुरू केले जाईल. ही लोकांची पुष्कळ वर्षांची मागणी आहे. जिल्हा इस्पितळाची सुधारणा, दक्षिण गोव्यातील नवे वैद्यकीय इस्पितळ, सोनसोडो कचरा प्रकल्प, रस्ता दुरुस्ती व सुरळीत वीजपुरवठा यासारखे प्रकल्प पुढील चार वर्षांत पूर्ण केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco News : सहा नद्यांचे राष्ट्रीयीकरण कोळशासाठी : कॅ. विरियातो फर्नांडिस

Lok Sabha Election 2024: ‘’चिदंबरम यांनी भ्रष्टाचार वाढवला, आरबीआयकडून सांगण्यात यायचे...’’; राजीव चंद्रशेखर यांचा हल्लाबोल

Cashew Farmer : निवडणुकीच्या धामधुमीत काजू उत्‍पादक वाऱ्यावर; उत्पादन कमी १६ हजार जणांना फटक

Heavy Rainfall in UAE: मुसळधार पाऊस अन् जोरदार वादळाने UAE पुन्हा बेहाल; उड्डाणे रद्द, इंटरसिटी बस सेवाही ठप्प

Loksabha Election 2024 : शिरोडा मतदारसंघातून धेंपेंना मताधिक्य देणार : मंत्री सुभाष शिरोडकर

SCROLL FOR NEXT