ED Raid On LYCA Productions : RRR आणि पोन्नियन सेल्वनच्या निर्मात्यांवर ईडीची धाड...

इडिचा रोख आता मनोरंजन क्षेत्राकडे आहे की असं वाटू लागलं आहे...
ED Raid On LYCA Productions
ED Raid On LYCA ProductionsDainik Gomantak

गेल्या काही दिवसांपासुन इडी आणि तिची कारवाई हा चर्चेचा मोठा विषय झाला होता. राजकिय किंवा उद्योग जगतातील व्यक्तींवर चेन्नईतील चित्रपट निर्मिती कंपनी LYCA प्रॉडक्शनवर अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने मंगळवारी छापे टाकले. Lyca Productions हे दक्षिण भारतातील सर्वात मोठं प्रॉडक्शन हाऊस आहे.

एसएस राजामौलीचा RRR, अल्लू अर्जुनचा पुष्पा: द राइज, रजनीकांतचा 2.0 आणि ऐश्वर्या राय बच्चनचा पोन्नियिन सेल्वन असे हिट चित्रपट याच बॅनरखाली बनवण्यात आले आहेत.

लायका प्रॉडक्शनचे मौन

लायका प्रॉडक्शनच्या परिसरात हे छापे टाकले असल्याची पोलीस सूत्रांनी ही माहिती दिली. मात्र, या छाप्याबाबत प्रॉडक्शन कंपनीकडून तातडीने कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्रीय तपास संस्थेने प्रॉडक्शन हाऊसविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवल्यानंतर चेन्नईतील सुमारे आठ परिसरांचा तपास सुरू आहे. Lyca Productions ची स्थापना 2014 मध्ये सुबास्करन अलीराजा यांनी केली होती.

Lycaproductions हा Lycamobile चा उपसमूह आहे. जो दक्षिण भारतात बनवलेल्या चित्रपटांचे प्रॉडक्शन आणि वितरण पाहतो.

बेकायदेशीर नफ्याचा आरोप

ईडीने टी नगर, अड्यार आणि करपक्कमसह लायकाच्या आठ ठिकाणांवर ही छापे मारी केली आहेत. ईडीचा हा छापा फेमा उल्लंघनाशी संबंधित प्रकरणात टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये पीएमएलए शुल्काचाही समावेश करण्यात आला आहे.

एका निवेदनात, ईडीने आरोप केला की, "मार्टिन आणि त्याच्या सहयोगी कंपन्या आणि संस्थांनी 01.04.2009 ते 31.08.2010 या कालावधीत बक्षीस विजेत्या तिकिटांचे दावे करून बेकायदेशीर नफा कमावला, ज्यामुळे सिक्कीम सरकारचे 910 कोटी रुपयांचे नुकसान झाले.

ED Raid On LYCA Productions
Tamanna Bhatia - Vijay Varma : तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा कान्सच्या रेड कार्पेटवर एकत्र फिरणार?

लायका प्रॉडक्शनचे यश

गेल्या काही वर्षांत लायका प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनलेले अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत. यापैकी राम चरण आणि ज्युनियर एनटीआर स्टारर चित्रपट आरआरआरने केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात नाव कमावले.

गेल्या काही वर्षांत लायका प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनलेले अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत. यापैकी राम चरण आणि ज्युनियर एनटीआर स्टारर चित्रपट आरआरआरने केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात नाव कमावले. याशिवाय कब्जा, थुनिवू आणि २.० ने या चित्रपटांनीही बंपर कमाई केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com