Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Disputes: 'म्हादई'बाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत केंद्र सरकारला करणार 'ही' विनंती

म्हादेई खोऱ्यातील कर्नाटक सरकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर लक्ष ठेवण्यासाठी समिती

Akshay Nirmale

CM Pramod Sawant On Mahadayi Water Disputes: गोव्याची जीवनदायिनी म्हादई नदीचा अविभाज्य भाग असलेल्या कळसा-भांडुरा या उपनद्यांचे पाणी कर्नाटकात वळविण्याच्या कामाचा सुधारीत आराखडा केंद्रीय जल आयोगाने मंजूर केला. त्याच्या तीव्र प्रतिक्रीया गुरूवारपासून राज्यात उमटत आहेत. गोव्याचे नेतृत्व अपयशी ठरल्याची भावना निर्माण झाली असून त्या पार्श्वभुमीवर आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रश्नाबाबत प्रतिक्रीया दिली आहे.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, म्हादई पाणी प्रश्नाबाबत राज्याचे जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांच्यासमवेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय जल शक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची लवकरच भेट घेणार आहे. कानावर म्हादई पाणी वाटपाबाबतची सर्व माहिती या दोन्ही केंद्रीय मंत्र्यांच्या कानावर घातली जाईल. केंद्रीय जल आयोगाने दिलेली परवानगी मागे घेण्याची विनंती केंद्र सरकारला करणार आहेत.

या शिवाय राज्याच्या वतीने एक या प्रकरणावर लक्ष ठेवण्यासाठी एक मंडळ किंवा समिती नेमली जाईल. म्हादई खोऱ्यात कर्नाटक सरकारकडून होत असलेल्या बेकायदेशीर कृत्यांवर ही समिती नजर ठेवेल, असेही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

दरम्यान, कर्नाटकला जल आयोगाकडून मिळालेल्या मंजुरीमुळे म्हादईच्या पाण्यावरून गोव्याचा हक्क डावलला जाईल, अशी भीती निर्माण झाली आहे. जरी आयोगाने कर्नाटकला आवश्यक त्या परवानग्या घ्याव्यात असे सांगितले असले तरी कर्नाटक मात्र सर्व निकष, नियमांचे पालन करेलच याची शाश्वती नाही, त्यामुळे गोमंतकीयांतून या मुद्यावरून सरकारबाबत नाराजी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT