Nilesh Cabral : पाणी बिल न भरणाऱ्यांचे कनेक्शन 1 फेब्रुवारीपासून तोडणार

पाणीबिल थकबाकीदारांसाठी OTS योजनेस प्रारंभ
Nilesh Cabral
Nilesh Cabral Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Nilesh Cabral : राज्यातील थकीत पाणी बिल असलेल्यांसाठी वन टाईम सेटलमेंट (OTS) योजनेस प्रारंभ करण्यात आला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल यांच्या हस्ते या योजनेचा प्रारंभ झाला. यावेळी पाणी बिल न भरणाऱ्यांचे पाणी कनेक्शन 1 फेब्रुवारीपासून तोडणार असल्याचा इशारा मंत्री निलेश काब्राल यांनी दिला.

Nilesh Cabral
Anjuna: हणजूण येथे एक लाख रूपयांच्या अमली पदार्थांसह दोघांना अटक

राज्यात पाणी बिलांची थकबाकी सुमारे 45 कोटीवर आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने वन टाईम सेटलमेंट ऑनलाईन योजना लागू केली आहे. ही थकबाकीची रक्कम जमा करण्यासाठी या योजनेत हप्त्यानुसार बिलाच्या व्याजावर सवलत दिली जाईल. या योजनेचा लाभ न घेतल्यास फेब्रुवारीपासून पाणी बिलांची थकबाकी असणाऱ्या ग्राहकांचा पाणीपुरवठा बंद केला जाईल.

ही योजना ऑनलाईन असून ती जानेवारी महिन्यापुरतीच लागू असेल. जानेवारी महिन्यात ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी ऑनलाईन नोंदणी करायची आहे. त्यांनाच या योजनेचा लाभ मिळू शकतो. ज्यांनी ही नोंदणी केलेली नसेल त्यांना तो लाभ मिळणार नाही. त्या थकबाकीदारांविरुद्ध खात्यातर्फे त्वरित कारवाईला सुरुवात केली जाईल, अशी माहिती काब्राल यांनी दिली.

Nilesh Cabral
Margao : मडगावात बर्निंग कारचा थरार; भरधाव गाडीने घेतला पेट, सुदैवाने चालक बचावला

पाणी पुरवठा खात्यातर्फे ग्राहकांना तसेच कंपन्यांना पाण्याची बिले देऊनही ती वेळेवर भरली जात नाहीत. पाणी मीटर बंद पडल्याचे तसेच पाणी पुरवठा होत नसल्याची कारणे देऊन काहींनी ही बिले भरलेली नाहीत. मुबलक पाणी न मिळता पाण्याची बिले मात्र भरमसाट येतात असा काहींचा दावा आहे. त्यामुळे ही बिले भरण्यासाठी खात्याने OTS योजना जारी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Rainfall Deficit 2026
 Shappora River water Goa
Mhadei Water Dispute
379 Rupees Food Order Viral Post
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com