CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: बजेटपुर्वी मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक; जाणून घेतली विविध घटकांची मते...

बजेटची तारीख अद्याप निश्चित्त केली नाही

Akshay Nirmale

CM Pramod Sawant: गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवार, 27 मार्चपासून सुरवात होत आहे. त्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज, गुरूवारी विविध घटकांसोबत बैठक घेतली.

त्यातून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विविध घटकांच्या बजेटविषयीच्या इच्छा, आकांक्षा जाणून घेतल्या. दरम्यान, बजेट कधी जाहीर होणार याची तारीख अद्याप निश्चित्त केलेली नाही. उद्या मंत्रीमंडळ बैठक होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

गोव्याच्या उद्योग क्षेत्रातील विविध संस्था यावेळी उपस्थित होत्या. त्यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली.

यात गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, लघु उद्योग, शेतकरी, गोवा बागायतदार, कृषी व पणण, फिशरीज, मद्य उद्योग, पेट्रोल डिलर्स, सीए, सोलर पॉवर, मायनिंग असोसिएशन, गोवा टेक्नॉलॉजी असोसिएशन, ऑटोमोबाईल डीलर्स अशा बहुतांश संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होत्या.

इझ ऑफ डुईंग बिझनेस साठी या घटकांकडून विविध सुधारणा सुचविण्यात आल्या आहेत. त्यावर विचार केला जात आहे. काही जणांनी करांमध्ये बदल किंवा कपात सुचविली आहे. व्हॅटबाबत नवीन योजना आणावी, अशा व्हॅट, जीएसटी बाबत मागण्या करण्यात आल्या आहेत.

हॉटेल असोसिएशनने, लिकर असोसिएशनने, एंटरटेन्मेंट सोसायटी यांनी विविध सूचना केल्या आहेत. मनोरंजन आणि जाहिरातींबाबत धोरण असावे, अशी सूचना आली आहे.

महसूल कसा वाढेल, खासगी गुंतवणूक कशी वाढेल, नवे उद्योग कसे येतील, त्यातून रोजगार कसा वाढेल, याचा विचार केला जात आहे. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत या सूचनांबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

यंदाचे बजेट सर्वांना सामावून घेणारे बजेट असेल. सर्व उद्योगांना यात सामावून घेतले जाईल. आम्ही ठरवलेल्या बहुतांश सर्व जणांशी चर्चा केली आहे. जे उरलेत त्यांच्याशीही चर्चा केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Terrorists Attack in Pakistan: पाकिस्तानात मोठा दहशतवादी हल्ला; 'पॅरा मिलिट्री फोर्सेस'च्या मुख्यालयात घुसून गोळीबार, तीन सैनिक ठार Watch Video

St. Xavier Feast: ओल्ड गोवा फेस्तमुळे फोंडा-पणजी मार्गावर मोठे बदल, वाहतुकीचे नवे नियम लागू; पर्यायी मार्ग कोणते?

Chief Justice of India: न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे 53 वे सरन्यायाधीश; 6 देशांच्या मुख्य न्यायाधीशांसमोर घेतली शपथ, जाणून घ्या त्यांच्याविषयी VIDEO

Goa vs Assam: गोव्याचे फलंदाज मोठ्या खेळीपासून वंचित, आसामविरुद्ध पहिल्या दिवसअखेर 4 बाद 218 धावा

Goa Live News: गोव्यात क्रूझ पर्यटनाचा श्रीगणेशा! 'सेलिब्रिटी मिलेनियम' जहाज २ हजार प्रवाशांसह दाखल

SCROLL FOR NEXT