MLA Delilah Lobo: पर्यटकांना मारहाण ही अ‍ॅक्शनची रिअ‍ॅक्शन; कर्मचाऱ्यांची चूक नाही, पर्यटकांवरच गुन्हा नोंदवा!

आमदार दिलायला लोबो यांची मागणी; हणजुणेतील पर्यटक-कर्मचारी मारहाण प्रकरण
Delilah Lobo
Delilah LoboDainik Gomantak
Published on
Updated on

MLA Delilah Lobo: उत्तर गोव्यातील हणजुणे येथे दिल्लीचे पर्यटक आणि रिसॉर्टचा कर्मचारी यांच्यात झालेल्या मारहाण, शिवीगाळ प्रकरणात आता आमदार दिलायला लोबो यांनीही आपले मत मांडले आहे. रिसॉर्टच्या कर्मचाऱ्यांची काहीही चूक नव्हती. त्या पर्यटकांवरच गुन्हा दाखल करा, अशी मागणी लोबो यांनी केली आहे.

(Anjuna Tourist Attacked incident)

Delilah Lobo
Panji Traffic Issue: सलग तिसऱ्या दिवशी पणजीत वाहतूक कोंडी

आमदार दिलायला लोबो म्हणाल्या की, दोन आठवड्यांपुर्वी हणजुणे येथे ही घटना घडली होती. पर्यटकांवर हल्ला झाल्याचे सांगण्यात येत होते. पण पर्यटकांवर हल्ला का करण्यात आला? रॉयस्टन हा त्या हॉटेलसाठी काम करत होता.

हे सर्व पर्यटक स्विमिंग पुलमध्ये हुक्का ओढत होते. रॉयस्टनने त्यांना सांगितले की हा स्मोकिंग झोन नाही. त्यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर हॉटेल मॅनेजरने रॉयस्टनला सांगितले की, तु घरी जा.

त्यामुळे तो घरी गेला. पण तो विसरलेला चार्जर नेण्यासाठी परत हॉटेलवर आला. त्यावेळी स्विमिंगपुलमधील हे सर्व पर्यटक त्याच्यावर धाऊन गेले. यात त्याच्यासह आणखी एका कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. दोघांनाही टाके पडले आहे.

त्याचा वैद्यकीय अहवालही आहे. त्याच्या प्रत्युत्तरात कर्मचाऱ्यांनी त्या पर्यटकांवर हल्ला केला. ती अ‍ॅक्शनची रिअ‍ॅक्शन होती.

Delilah Lobo
Goa Corona Update: गोव्यातील कोरोनाची सक्रीय रूग्णसंख्या पोहचली 142 वर

आधी पर्यटकांनी मारहाण केली त्याविषयी कोणीच बोलत नाही. ग्रामस्थांनीही याबाबत पोलिसांना दखल घेण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी पर्यटकांवर गुन्हा नोंदवलेला नाही. त्या पर्यटकांवरच गुन्हा नोंदवला पाहिजे. पर्यटकांना दुसऱ्याच दिवशी डिस्चार्ज दिला होता. त्यांनी जाऊन सोशल मीडियात व्हिडिओ शेअर केला. त्यांनी जे स्थानिकांबाबत जे घडले आहे, ते चुकीचे आहे. स्थानिकांवर गुन्हे दाखल केले पण पर्यटकांवर काहीही कारवाई झालेली नाही.

पर्यटकांची अल्कोहोल टेस्ट करून त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे. मुख्यमंत्री, पोलिस अधीक्षक यांना विनंती आहे. या प्रकरणात लक्ष घालावे, असेही आमदार दिलायला लोबो यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com