Kudchire People Dainik Gomantak
गोवा

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Kudchire Waste Management Projects: नियोजित प्रकल्पाच्या मुद्यावरुन कुडचिरेवासियांनी सुरु केलेल्या आंदोलनाला अखेर यश आले असून, नियोजित वादग्रस्त प्रकल्प रद्द झाल्यातच जमा आहे.

Manish Jadhav

डिचोली: नियोजित प्रकल्पाच्या मुद्यावरुन कुडचिरेवासियांनी सुरु केलेल्या आंदोलनाला अखेर यश आले असून, नियोजित वादग्रस्त प्रकल्प रद्द झाल्यातच जमा आहे. कुडचिरेतील जनतेचा विरोध आणि भावनांचा विचार करुन नियोजित प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतला आहे.

मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सकारात्मक प्रतिसाद देताना प्रकल्पाचा विषय तूर्त बासनात गुंडाळला आहे. अशी माहिती मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी कुडचिरे पंचायत मंडळ आणि भाजप समर्थक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत दिली.

आज (बुधवारी) डिचोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेस कुडचिरेची सरपंच प्रियंवदा गावकर, उपसरपंच तुळशीदास चिबडे यांच्यासह अंजली च्यारी, दिया गावकर, मिथिल गावस आदी पंचसदस्य माजी सरपंच मधू नाईक, तसेच उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष शंकर चोडणकर, माजी अध्यक्ष अंकिता न्हावेलकर, भाजप मंडळाचे अध्यक्ष दयानंद कारबोटकर, सचिव विश्वास चोडणकर, प्रेमानंद महांब्रे आदी भाजप कार्यकर्त्यांसह सदा गावकर आणि कुडचिरेतील ग्रामस्थ उपस्थित होते.

गावकऱ्यांनी एकसंध रहावे

कुडचिरेतील प्रकल्पावरुन काहीजण राजकारण करुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. जनतेने अपप्रचाराला बळी न पडता एकसंध राहून गावातील सलोखा कायम ठेवावा. असे आवाहनही आमदार शेट यांनी केले. 'कन्स्ट्रक्शन आणि डेब्रिज'च्या नावाखाली गावात प्रकल्प नकोच. या मागणीशी कुडचिरेवासिय ठाम आहेत.

गावाला नको, तर पूर्ण पंचायत मंडळ कुडचिरे गावाबरोबर आहे. असे सरपंच प्रियंवदा गावकर यांनी स्पष्ट करुन नियोजित प्रकल्प रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले. कुडचिरेतील एक ज्येष्ठ नागरिक सदा गावकर यांनीही प्रकल्पासंदर्भात मत व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT