CM Promod Sawant
CM Promod Sawant Gomantak Digital Team
गोवा

CM Pramod Sawant : समृद्ध गोमंतकीय संस्कृतीचे विदेशींना दर्शन; महत्त्वाची बाब !

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji : देशाला समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे. तसा तो राज्यालाही लाभला आहे,गोमंतकीय संस्कृतीचे दर्शन ‘जी २०’ च्या निमित्ताने देशविदेशातील प्रतिनिधींना होत आहे, ही बाब महत्त्वाची आहे,असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले

जी20 च्या विकासात्मक कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीचे आयोजन दोनापावला येथील ताज कन्व्हेन्शन सेंटरमध्ये करण्यात आले आहे. यानिमित्ताने सेरेन्डीपिटी आर्ट्सने विकसित केलेल्या ‘आर्ट हॉटेल’ या प्रकल्पाचे अनावरण मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

देशातील तसेच गोव्यातील महत्वाच्या, दुर्मिळ अशा सांस्कृतिक बाबींची ओळख देशविदेशातील प्रतिनिधींना करून देण्याच्या हा प्रयत्न आहे. यावेळी परराष्ट्र मंत्रालयाचे सहसचिव के. नागराज नायडू, वाहतूक, उद्योग मंत्री माविन गुदिन्हो, ‘जी20’ साठीचे राज्याचे नोडल अधिकारी संजित रॉड्रिग्स आणि सेरेंडिपिटी आर्ट्सचे संस्थापक सुनील कांत मुंजाल उपस्थित होते. भारताची सांस्कृतिक ओळख बनलेल्या वैविध्यपूर्ण हस्तकला परंपरांना एकत्र आणून जगाला दाखवणे, या उद्देशाने हा प्रकल्प राबवला जात आहे.

सेरेंडीपिटीच्या आर्ट हॉटेल प्रदर्शनास प्रारंभ नामवंत कलाकारांचे योगदान

या कलासंस्कृती कार्यात अहसान अली, अकबर खान, भुवनेश प्रसाद, दिनेश चंद्र कुम्हार, अनटायटल्ड डिझाईनचे 'फर्गोनॉमिक्स', इक्बाल अहमद, जय प्रकाश, मोहम्मद घौश, मोहन कुमार वर्मा, ओम प्रकाश गलव, ऊर्जा डिझाइन्स एलएलपी, प्रियांका नरुला, राम सोनी, राजेश टी. आचार्य, शंकर विश्वकर्मा, सुकुमार गुडिगर आणि सुंदरीबाई आदी कलाकारांचे योगदान आहे,असेही सेरेंडीपिटी आर्टस चे संस्थापक सुनील कांत मुंजाल म्हणाले.

प्रदेशांनुरूप भारतातील कला आणि हस्तकलांमध्ये विविधता आढळते. सेरेंडीपिटी आर्ट्ससोबत भागीदारी केलेला या अनोख्या ‘आर्ट हॉटेल’ प्रकल्पातून जी२० प्रतिनिधींना भारताचा इतिहास, संस्कृती आणि वारसा समजून घेण्याची संधी मिळेल.

डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

जी२० बैठकींच्या माध्यमातून जगाला भारतातील श्रीमंत इतिहास, संस्कृती व वारसा यांचा अनोखा अनुभव मिळत आहे ही बाब महत्वाची आहे.

माविन गुदिन्हो, मंत्री

प्रदर्शनाचे उद्दिष्ट

आर्ट हॉटेल या अनोख्या प्रदर्शनाद्वारे संस्कृती आणि कलाप्रकार यांच्या माध्यमातून भारतीय उपखंडातील इतिहास आणि मार्गक्रमणाला कशी दिशा मिळत गेली यावर प्रकाशझोत टाकणे, हे सेरेंडिपिटी आर्ट्सचे उद्दिष्ट आहे.

कलेच्या माध्यमातून कलाकार, कारागीर, प्रदेश आणि संस्कृतींना एकत्र आणतात, या विचाराने आणि विश्वासाने आम्ही गत काही वर्षांत आम्ही दक्षिण आशियातील कला आणि सर्जनशील व्यावसायिकांसाठी अनेक व्यासपीठे विकसित केली. गोव्याला एक जागतिक सांस्कृतिक केंद्र बनवण्याच्या आमच्या वचनबद्धतेवर आम्ही ठाम आहोत.

सुनील कांत मुंजाल, सेरेंडिपिटी आर्ट्सचे संस्थापक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj Thackeray: मुंबई-गोवा महामार्गासाठी राज ठाकरेंच भर सभेत मोदींकडं साकडं

OCI चे भवितव्य आता गृहमंत्री अमित शहांच्या हाती, CM सावंत म्हणतात... 'आम्ही कोणाला फसविले नाही'

India Russia Relations: भारत रशिया यांच्यात होणार मोठा करार; पुतिन सरकारच्या सहकार्याने बनवला ‘हा’ प्लॅन

Swati Maliwal Assault Case: 'भाजपने षड्यंत्राचा भाग म्हणून स्वाती मालीवाल यांना...', 'आप' नेत्या आतिशी यांचा घणाघात

Mumbai Goa Highway: कधी सुरू होणार मुंबई-गोवा महामार्ग? उज्वल निकम यांच्या प्रचार सभेत गडकरींनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT